शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

नागपुरात तीन वर्षांत ४,९०६ झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:49 IST

ग्रीन सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. शहरातील झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. तसेच विकास कामासाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यानंतरच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडे तोडण्याची परवानगी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मागील १० वर्षांत जवळपास १० हजार झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली तर गेल्या तीन वर्षांत ४,९०६ झाडे तोडण्यात आली. याबदल्यात शहरात २४ हजार नवीन झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र अपवाद वगळता नवीन झाडे लावण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देग्रीन सिटीची ओळख पुसण्याचा धोका : नवीन झाडे लागलीच नाहीमनपाच्या तिजोरीत कोट्यवधीचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रीन सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. शहरातील झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. तसेच विकास कामासाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यानंतरच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडे तोडण्याची परवानगी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मागील १० वर्षांत जवळपास १० हजार झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली तर गेल्या तीन वर्षांत ४,९०६ झाडे तोडण्यात आली. याबदल्यात शहरात २४ हजार नवीन झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र अपवाद वगळता नवीन झाडे लावण्यात आलेली नाही.शहराचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, महामार्गाचे बांधकाम, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालय, मध्य रेल्वे, शासकीय दंत महाविद्यालय यासासह विविध शासकीय विभाग, खासगी संस्था तसेच खासगी बांधकामासाठी गेल्या तीन वर्षांत ४,९०६ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी देताना अर्जधारकाने एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे बंधनकारक आहे. संबंधितानी झाडे लावावीत यासाठी एक झाड तोडण्याची परवानगी घेताना ५,५०० रुपये उद्यान विभागाकडे अनामत रक्कम जमा करावी लागते. संबंधितांनी नवीन झाडे न लावल्यास ही रक्कम परत केली जात नाही. एप्रिल २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत उद्यान विभागाकडे २ कोटी ६९ लाख ८३ हजार इतकी रक्कम जमा झाली. पण नवीन झाडे न लावल्यास भविष्यात उपराजधानीची ग्रीन सिटीची ओळख पुसण्याचा धोका आहे.विशेष म्हणजे तोडण्यात आलेली झाडे प्रामुख्याने ६० ते ७० वर्षांपूर्वीची आहेत. याचा पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. झाडे तोडण्याची परवानगी देताना संबंधितांनी नवीन झाडे न लावल्यास अनामत रक्कम जप्त केली जाते. परंतु अनामत रक्कम व झाडे याची तुलनाच चुकीची आहे. पर्यावरणाचा विचार करता पैशाच्या तुलनेत झाडे लावणे अधिक महत्त्वाचे आहे. झाडे तोडण्याची परवानगी घेतल्यानंतर मेट्रो प्रशासनाने अमरावती मार्ग व अन्य काही भागात नवीन झाडे लावली. परंतु खासगी विकासक वा शासकीय कार्यालयाकडून नवीन झाडे लावण्याला प्रतिसाद नसल्याचे वास्तव आहे.मेट्रो रेल्वे व मध्य रेल्वेला गेल्या तीन वर्षांत दोन हजाराहून अधिक झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ५७२, कॅन्सर रिलिफ सोसायटीला १९४, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय २०६, व्हीएनआयटीला १२८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ७८ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. परंतु एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे तर दूर एकही झाड न लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे.झाडे लावल्यानंतरच परवानगीझाडे तोडण्याची परवानगी घेताना नवीन झाडे लावण्याची ग्वाही दिली जाते. परंतु प्रत्यक्षात झाडे लावली व जगविली जात नाही. याचा विचार करता महापालिका प्रशासनाने आता झाडे तोडण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी झाडे लावणे बंधनकारक केले आहे. तीन महिन्यांची झाडे झाल्यानंतर परवानगी दिली जाईल. तसेच प्रत्येक तीन महिन्यांनी लावलेल्या झाडांचा आढावा घेतला जाईल. तीन वर्षांची झाडे झाल्यानंतर अर्जधारकाला अनामत रक्कम परत क रण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.अमोल चौरपगार, उद्यान अधीक्षक महापालिका

 

टॅग्स :environmentवातावरणnagpurनागपूर