शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

अभिनय करताना ‘पॉज’ का घेता? चिरपरिचित स्टाईलवर विक्रम गोखले म्हणाले होते..

By प्रविण खापरे | Updated: November 26, 2022 17:13 IST

Vikram Gokhale : ‘के दिल अभी भरा नहीं’चा नागपुरातून झाला होता शुभारंभ : आंबेडकरी विचारांशी होती आपुलकीची जवळीक

ठळक मुद्देविक्रम गोखलेंनी ७७व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

नागपूर : रंगभूमीवर आपल्या दिलखेच अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर विलक्षण प्रभाव टाकणाऱ्यांपैकी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले एक होते. निळू फुले, श्रीराम लागू आणि विक्रम गोखले, यांच्या अदाकारीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, दोन संवादाच्या मधात किंवा कधीकधी एकाच वाक्यसंवादाला मधातच तोडून घेतलेले विशिष्ट अंतर (पॉज) होते. हे जे अंतर असायचे, त्यात त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन प्रेक्षकांना घायाळ करत असत. हे अंतरच प्रेक्षकांना संबंधित पात्राच्या मनातील गुंता किती तिव्र असेल, त्याच्या मनात कोणती चलबिचल चालली आहे, याची जाणिव करवून देणारे ठरत होते. विक्रम गोखले यांच्या निधनाने, या ‘पॉज’ तिकडीचा कदाचित अखेर झाला असेच म्हणावे लागेल.

विक्रम गोखले २०११-१२ मध्ये एका आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आले असता, खासगी भेटीत त्यांना ‘विक्रम गोखलेंचा पॉज म्हणजे काय असतो’ असा सवाल विचारला होता. तेव्हा त्यांनी ‘जरा थांब’ असे म्हणत, एक उच्च श्वास घेतला आणि त्या उच्च श्वासात त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन उफाळले गेले ते बोलके होते. त्यानंतर ‘तुला कळला का पॉज’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. ‘हा पॉज विक्रम गोखलेचा वगैरे नसतो तर त्या पात्राच्या संवेदनेचा असतो. त्या पात्राच्या उचंबळलेल्या भावना केवळ आणि केवळ संवेदनशील मनालाच कळतात.

मराठी नाट्यरसिक संवेदनशील असल्यानेच त्याला ‘पाॅज’चे महत्त्व कळते’ असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर ते संबंधित कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या मनातील आंबेडकरी विचारांची निष्ठा आणि आंबेडकरी समाजाबद्दल आपुलकी व्यक्त केली होती. ही भावना व्यक्त करताना जातीभेद सोडा आणि सगळे एकोप्याने नांदा, असे आवाहनही त्यांनी केले होते. शेखर ढवळीकर लिखित व मंगेश कदम दिग्दर्शित ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचा शुभारंभ मुंबई किंवा पुणे येथून न करता नागपुरातून करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात या नाटकाचे बरेच प्रयोग त्यावेळी पार पडले होते.

२०१५ मध्ये नागपुरातूनच रंगभूमीवरचे पुनरागमन

- १९ फेब्रुवारी २०१३ रोजी पेण येथे विक्रम गोखले यांनी आता आपण रंगभूमीवरून सन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, शेखर ढवळीकर यांचे ‘के दिल अभीं भरा नहीं’ हे नवे नाटक त्यांनी ऐकले आणि आपला तो निर्णय चुकला याची जाणिव त्यांना झाली. नाटकासाठी गोखले यांना विचारणा झालीतेव्हा त्यांनी लगेच होकार कळवला आणि सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने त्यांचे रंगभूमीवर पुनरागमन झाले होते. या नाटकाद्वारे प्रथमच विक्रम गोखले व रिमा लागू ही जोडी रंगभूमीवर अवतरली होती. नाटकात जयंत सावरकरही महत्त्वाच्या भूमिकेत होते.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेSocialसामाजिकnagpurनागपूर