शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

शाळांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 8:23 PM

स्कूलबससंदर्भातील कायदा व नियमांचे पालन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये शाळांनी सादर केलेल्या माहितीची पोलीस आयुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पडताळणी करून घ्यावी व त्यावर दोन आठवड्यांत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.

ठळक मुद्देस्कूलबस नियम अंमलबजावणीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कूलबससंदर्भातील कायदा व नियमांचे पालन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये शाळांनी सादर केलेल्या माहितीची पोलीस आयुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पडताळणी करून घ्यावी व त्यावर दोन आठवड्यांत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यात तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला. याशिवाय अ‍ॅड. मिर्झा यांनी १२ आसनी व्हॅनही स्कूलबसच्या व्याख्येत मोडत असल्याचे व त्यासंदर्भातील माहिती अद्याप रेकॉर्डवर आली नसल्याचे सांगितले. परिणामी, न्यायालयाने शासनाला यावरही उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.याविषयी न्यायालयाने २०१२ मध्ये स्वत:च जनहित याचिका केली आहे. आतापर्यंत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे स्कूलबस परिवहनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. स्कूलबस नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रकरणात १३७ शाळांना प्रतिवादी करण्यात आले आहे. शाळांनी आधी मुजोरीची भूमिका घेतली होती. परंतु, आवश्यक दणके दिल्यानंतर सर्व शाळा सुतासारख्या सरळ होऊन न्यायालयात हजर झाल्या.तर होईल अवमानना कारवाईपडताळणीमध्ये शाळांनी न्यायालयात चुकीची माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अवमानना कारवाई केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून हे प्रकरण अत्यंत महत्वाचे असून त्याबाबत न्यायालय अतिशय गंभीर आहे. तसेच, शाळांनीही हा विषय गंभीरतेने घ्यावा अशी तंबी न्यायालयाने यापूर्वी दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा