शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आकसयुक्त फौजदारी तक्रारी वेळीच रद्द करणे आवश्यक : हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:26 IST

मनात आकस ठेवून, वाईट हेतूने किंवा विरोधातील व्यक्तीला धडा शिकविण्याच्या सुप्त उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारी वेळीच रद्द करणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याला कायद्याचा दुरुपयोग करू दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. खरा न्याय करण्यासाठी व कायद्याचा दुरुपयोग थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ द्वारे अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत असेही निर्णयात नमूद करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देकायद्याचा दुरुपयोग होऊ दिला जाऊ शकत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनात आकस ठेवून, वाईट हेतूने किंवा विरोधातील व्यक्तीला धडा शिकविण्याच्या सुप्त उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारी वेळीच रद्द करणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याला कायद्याचा दुरुपयोग करू दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. खरा न्याय करण्यासाठी व कायद्याचा दुरुपयोग थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ द्वारे अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत असेही निर्णयात नमूद करण्यात आले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.अभियांत्रिकीचा विद्यार्थी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (२१) याच्याविरुद्ध त्याच्या मैत्रिणीने २६ डिसेंबर २०१८ रोजी अजनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. त्यावरून अनिकेतविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तो एफआयआर रद्द करण्यासाठी अनिकेतने अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संबंधित मुलीने वाईट हेतूने तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवर कार्यवाही केल्यास कायद्याचा दुरुपयोग होईल असा दावा अर्जात करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने पोलीस तक्रार व अन्य कायदेशीर तरतुदी लक्षात घेता अनिकेतचा अर्ज मंजूर करून वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवले.पोलीस तक्रारीनुसार, संबंधित मुलगी २०१६ मध्ये अनिकेतच्या संपर्कात आली होती. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली व कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जानेवारी-२०१७ मध्ये अनिकेतने तिला लग्नाची मागणी घातली. दरम्यान, दोघांनी सहमतीने वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर अनिकेतने लग्नाला नकार दिला. परिणामी, मुलीने पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. ती तक्रार न्यायालयाचा विश्वास संपादित करू शकली नाही. अनिकेतने पहिल्यावेळी बळजबरी केल्याचा मुलीने आरोप केला होता. परंतु, त्या दिवशी ती स्वत:च अनिकेतच्या घरी गेली होती. तसेच, अनिकेतचा सुरुवातीपासूनच लग्न करण्याचा विचार नव्हता असेही तक्रारीत आढळून आले नाही. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण कायम ठेवल्यास कायद्याचा दुरुपयोग होईल असे स्पष्ट करून एफआयआर रद्द केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस