शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:20 IST

शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.

ठळक मुद्देचालकांशी दादागिरी कशाला : रस्त्यावर अतिक्रमण, लोक वाहने ठेवणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.शहरातील बाजारपेठांमधील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. काही बाजारपेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. पण दोन-पाच मिनिटांच्या कामासाठी दुचाकीस्वाराला १० रुपये देणे परवडणारे नाही. रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. वाहतूक पोलीस विभागाने महसूल गोळा करण्याच्या नावाखाली शहरातील वाहने उचलण्याची मोहीमच राबविली आहे. शहरातील मीठानिम, एमआयडीसी, इंदोरा, दोसरभवन, अजनी या वाहतूक विभागातील पथकाकडून दररोज शेकडो वाहने उचलली जातात. बरेचदा वाहने उचलताना वाहन चालकांशी उचलणाऱ्या मजुरांच्या खटापटीही उडतात. दुचाकी चालकासोबत दादागिरी करण्यात येते. या सर्व प्रकाराला वाहतूक पोलिसांची मूकसंमती असते. गाडी उचलताना नागरिकांशी झालेल्या झटापटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मुळात वाहने उचलण्यासंदर्भातसुद्धा काही नियम आहेत. पण या नियमांचे पालन वाहतूक पोलीस स्वत:च करताना दिसत नाही. वाहन उचलण्यापूर्वीसार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास वाहने उचलावी.वाहने उचलण्यापूर्वी पोलिसांकडून स्पीकरवर दोन वेळा सूचना देणे गरजेचे आहे.उचललेल्या वाहनाच्या जागेवर खडूने गोल करून, त्यावर चौफुली मारावी.उचललेल्या गाडीचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. परंतु गाडीचे नुकसान झाल्यास कुणीही जबाबदारी घेत नाही. वाहने उचलणाऱ्याची चारित्र्य पडताळणी नाहीवाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचा वर्षभराचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. हा ठेकेदार २५० ते ३०० रुपये रोजीवर वाहतूक विभागाला माणसे पुरवितो. परंतु या माणसांची चारित्र्य पडताळणी केली जात नाही. या माणसांना दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक वाहने उचलल्यास ठेकेदाराकडूनत्यांना बक्षीसही दिले जात असल्याची माहिती आहे. हे बक्षीस मिळविण्याच्या उद्देशातून वाहनाची उचलेगिरी करणारी ही माणसे नियमांचेही पालन करीत नाही. उलट दादागिरीवर उतरतात. वाहनांच्या डिक्कीतील साहित्याची जबाबदारी कुणाची ?वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेल्या गाडीच्या डिक्कीतील साहित्य हरविल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. महिलांच्या दुचाकी वाहनातील डिक्कीत तर अनेक मौल्यवान वस्तू असतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार हे उचलेगिरी करणारे टपूनच असतात. वाहतूक पोलीस मात्र याची जबाबदारी घेत नाही.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस