शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

कोविड-१९ लॉकडाऊननंतर जीएसटी कपात व कर परताव्याची वाहन उद्योगांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 10:08 IST

एप्रिलमध्ये शून्य विक्री नोंदविणाऱ्या वाहन उद्योगाला कोविड-१९ लॉकडाऊननंतर उत्पादन नव्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून कर भरपाई, परतावा आणि सरकारच्या देयकावर स्थगिती मिळावी, अशी इच्छा आहे.

सोपान पांढरीपांडेनागपूर : एप्रिलमध्ये शून्य विक्री नोंदविणाऱ्या वाहन उद्योगाला कोविड-१९ लॉकडाऊननंतर उत्पादन नव्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून कर भरपाई, परतावा आणि सरकारच्या देयकावर स्थगिती मिळावी, अशी इच्छा आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ऑटोमोबाईल उद्योगाचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे सात टक्के वाटा आहे. देशातील जवळजवळ चार कोटी लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार या उद्योगातून मिळतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात या उद्योगाचा ७ टक्के वाटा आहे. या क्षेत्रातील उत्पादक २.१० कोटींहून अधिक दुचाकी वाहने, ४० लाख कार आणि ११ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने ट्रक आणि बसेसचे उत्पादन करतात. या क्षेत्रात गेल्या एक वर्षापासून मंदी असून उत्पादन व विक्रीचा आलेख खाली आला आहे. एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन कालावधीत एकाही वाहनाची विक्री झालेली नाही.सर्वाधिक जीएसटी आणि बीएस-४ वरून बीएस-६ वर गेलेले उत्सर्जनाचे निकष या दोन कारणांमुळे हा उद्योग मंदीत आला आहे. सध्याच्या २८ टक्के जीएसटीवरून किफायत स्तरावर जीएसटी आणण्याची या उद्योगाची दीर्घकाळापासून मागणी आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ पाच टक्के शुल्क आकारले जाते. त्यामुळे ई-वाहने आाणि इंटरनल कॉम्बुशन इंजिन्स (आयसीई-व्हीएस) यांच्यातील अंतर खूपच जास्त असून ते वाजवी पातळीवर असावे, अशी या उद्योगाची मागणी आहे. दुसरे म्हणजे, सरकारने बीएस-४ वाहनांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख ३१ मार्च २०२० निश्चित केली होती. लॉकडाऊन हटल्यानंतर दहा दिवसांत न विकल्या गेलेल्या बीएस-४ वाहनांपैकी दहा टक्केच वाहनांची नोंदणी केली जाईल, असे जाहीर केले आहे. उद्योग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ हजारांपेक्षा जास्त कार, ८ हजार ट्रक व बस आणि जवळपास ६ लाख दुचाकी बीएस-४ विंटेज वाहने विक्रेत्यांनी ३१ मार्च २०२० पर्यंत विकली नाहीत. जर यापैकी केवळ १० टक्के वाहनांची नोंदणी झाली तर डीलर्स आणि वाहन उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे सर्व बीएस-४ वाहनांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे आणि यामुळेच ऑटो उद्योग पुन्हा सुरू करणे शक्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.जीएसटीमध्ये कपात करण्याबरोबरच उद्योग क्षेत्राची परवाना व परमिट शुल्क, सेवा शुल्क, भाडेपट्टी भाडे इत्यादींसारख्या सरकारी देयकावर स्थगिती आणि आयकर, कॉर्पोरेट कर आणि जीएसटी या व्यावसायिक करांचा त्वरित परतावा देण्याची मागणी आहे. मुदतीच्या कर्जाची परतफेड आणि कार्यरत भाडवली कर्जावर सरकारने तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे.ऑटोमोबाईल क्षेत्राबरोबरच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) जीडीपीमध्ये ३० ते ३५ टक्के वाटा आहे. या क्षेत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ११ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध आहेत. १.६० कोटी एमएसएमई दरवर्षी १२५ अब्ज डॉलर्सची निर्यात करतात. या महत्त्वाच्या क्षेत्राचीही ऑटोमोबाईल उद्योगांप्रमाणेच काही सवलती मिळाव्यात, अशी इच्छा आहे.कोविड-१९ लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाहन उद्योग आणि एमएसएमईना काही सवलती देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या वातावरणाला संजीवनी मिळेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस