शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात जनावरांना कोंबून नेणारे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:16 IST

कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदहेगाव शिवारातील घटनाआरोपी घटनास्थळावरून पसार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालक तेथून पसार झाला. जखमी गाईंना लगेच गोरक्षण सभेत पाठविण्यात आले.नागपूर जिल्ह्यातील कत्तलखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून चोरट्या मार्गाने जनावरे नेली जातात. असे प्रकार अनेकदा उघडकीस आले. अशा प्रकरणात पोलीस कारवाईही करण्यात आली. मात्र त्यानंतर हा प्रकार सुरूच असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथून नऊ गाईंना एमएच-३१/सीक्यू-७५०० क्रमांकाच्या बोलेरो जीपमध्ये कोंबून कत्तलखान्यात नेले जात होते. पहाटेच्या सुमारास दहेगाव (रंगारी) शिवारात बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. त्यात ती जीप उलटली. त्यामुळे त्यातील सर्व गाई जखमी झाल्या. बराच वेळ त्या घटनास्थळीच पडून होत्या. आरोपी जीपचालक घटनास्थळाहून पसार झाला. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सदर गाईंना गोरक्षण सभेत पाठविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान जळते, अर्पित पशिने करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात