शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

भाज्या घाऊकमध्ये आटोक्यात तर किरकोळमध्ये महागच !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 30, 2024 21:16 IST

- पावसाची भाज्यांना नवसंजीवनी : कोथिंबीर व हिरवी मिरची ६० ते ७० रुपये किलो.

नागपूर : धान्य, कडधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागपुरातील घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्याही दुप्पट आणि तिप्पट दरात विकल्या जात आहे. काही ग्राहकांनी आर्थिक बचतीसाठी घाऊक बाजाराकडे धाव घेतली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलो ६० रुपयांवर गेले आहे. भाज्यांना संजीवनी मिळाल्याने पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने किमती वाढल्या. पण काही दिवसातच उतरल्या. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती आटोक्यात आहेत. किरकोळमधील अतोनात किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा ७० टक्के माल विक्रीसाठी येत आहे. 

एप्रिल आणि मे महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला पोहोचतात. पण यंदा एप्रिलमध्ये आलेल्या पावसामुळे शेत हिरवेगार आहेत. शिवाय घाऊकमध्ये किमतीही कमी आहेत. किरकोळ विक्रेते खराब हवामानामुळे भाज्यांचे भाव वाढल्याचे कारण देत आहेत. पावसामुळे काही भाज्यांचा दर्जा घसरला आहे. तर दुसरीकडे पावसामुळे भाजी पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यानंतरही आवक वाढेल भाव कमी होतील, अशी प्रतिक्रिया महात्मा फुले फ्रूट व सब्जी मार्केट अडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी दिली. 

किरकोळमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, गवार, पालक, मेथी, फणस या भाज्यांचे भाव ६० ते ८० रुपयांदरम्यान आहेत. यंदा टोमॅटो आटोक्यात असून ३० रुपये किलो आहेत. लवकरच दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मदनपल्ली, तर सिमला मिरची, परवळ, कारले, तोंडले रायपूर, भिलाई, दुर्ग येथून विक्रीला येतात. कोथिंबीर स्थानिकांकडून आणि नाशिक तसेच जगदलपूर आणि मौदा येथून हिरवी मिरचीची आवक आहे. भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव : वांगे १५ ३०हिरवी मिरची ३० ६०कोथिंबीर ४० ६०टोमॅटो २० ४०फूल कोबी १५ ३०पत्ता कोबी १० २०भेंडी ३० ६०कारले ३० ६०चवळी शेंग२० ४०गवार शेंग ३० ६०पालक १० २०मेथी ३५ ६०कोहळ १० २०फणस ४० ७०कैरी ३० ६०

टॅग्स :nagpurनागपूर