शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच!

By admin | Updated: June 5, 2014 01:04 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात गृहिणींसाठी भाज्या स्वस्तच आहे. नागपूरलगतच्या भागात सिंचनाच्या सोयी वाढल्याने स्थानिक उत्पादकांकडून भाज्याची मोठय़ा प्रमाणात आवक आहे.

स्थानिकांची आवक वाढली : कांदे महागणारनागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्यात गृहिणींसाठी भाज्या स्वस्तच आहे. नागपूरलगतच्या भागात सिंचनाच्या सोयी वाढल्याने स्थानिक  उत्पादकांकडून भाज्याची मोठय़ा प्रमाणात आवक आहे. काही भाज्या वगळता किरकोळमध्ये टमाटर, वांगे, पत्ता कोबी, कोहळे, तोंडले या भाज्याचे  दर १0 रुपयांच्या घरात आहे. जूनमध्येही आवक वाढण्याच्या अपेक्षेने गृहिणींचा महिन्याचा खर्च आटोक्यात राहील. नागपूर जिल्ह्यात सिंचनामुळे सध्या भाज्यांची लागवड आणि उत्पादन वाढले आहे. यंदाच्या लग्नसराईत किफायत दरात                      मुबलक भाज्या  उपलब्ध आहेत.                 तीन महिन्यांआधी मुसळधार पावसामुळे भाज्या खराब झाल्या होत्या. तेव्हा शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात भाज्यांची  लागवड केली. ते उत्पादन आता बाजारात येत                  आहे. सध्या लहानमोठय़ा २00 पेक्षा जास्त गाड्यांची आवक असल्याची माहिती महात्मा  फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. नाशिकहून टमाटरची आवकस्थानिकांसह बाहेरूनही भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात आहे. नाशिक येथून टमाटर येत असून कॉटन मार्केटमध्ये भाव सहा रुपयांवर आहेत. मटर  जबलपूर येथून, गाजर दिल्ली आणि सिमला मिरची दिग्रसवरून, नाशिक येथून टमाटर, रायपूर येथून तोंडले, ओरिसातून फणस आणि जगदलपूर  येथून हिरवी मिरची येत आहे. (प्रतिनिधी)कांदे महागणार!कळमन्यात सध्या कांद्याची आवक कमी झाली असून १५ दिवसात कांदे महाग होण्याची शक्यता आहे. आवक १२ ते १५ ट्रकपर्यंंंत कमी झाली आहे.  उन्हाळी कांदा स्टोअर करता येतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी माल साठवून ठेवला. गरज पडेल तेव्हा विक्रीस काढण्याचे शेतकर्‍यांचे धोरण असल्याने पुढे  कांदा महागच मिळेल. बुलढाणा येथून लाल कांदा तर अमरावती व अकोला येथून पांढरा कांदा येत आहे. अहमदनगर येथून एक किंवा दोन ट्रक  आवक आहे. कळमन्यात भाव प्रति किलो ११ ते १२ रुपयांवर होते. काही दिवसात १५ रुपयांवर जाईल, अशी माहिती कळमन्यातील आलू-कांदा  असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. किरकोळमध्ये बटाटे २५ रुपये!छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथील बटाटे बाजारात विक्रीस येत आहेत. दररोज १२ ते १३ ट्रकची आवक आहे. रविवारी चांगल्या प्रतीच्या  बटाट्याचे भाव १६ ते १८ रुपये किलो होते. किरकोळमध्ये २५ रुपये दर आहेत.