शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भाज्या कडाडल्या; वांगी १०० तर कांदे ४० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:49 AM

नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

ठळक मुद्देआवक कमी झाल्याने गृहिणींचे बजेट बिघडले

रियाज अहमद।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १५ दिवसापासून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात सर्वाधिक भाव आहेत. आवक कमी झाल्यामुळे ठोक बाजारात सर्वच भाज्या महाग आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वधारले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात आहे. किरकोळ बाजारात वांगी १०० वर तर कांदे ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.नागपुरात भाज्यांची आवक पूर्णत: अन्य राज्य आणि महाराष्ट्रातील अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण या भागातूनही आवक कमी आहे. भाज्यांचे अडतिये आणि किरकोळ विके्रत्यांनुसार १५ दिवसापासून भाज्यांची आवक कमी झाली आहेत. किरकोळ बाजारात वांगे प्रति किलो ८० ते १०० रुपये आहेत. हे भाव १५ दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये होते. कांद्याचे भाव १५ ते २० रुपयांवरून ३५ ते ४० रुपयांवर, बिन्स शेंगा ८० वरून १६० ते २०० रुपये, गवार शेंग ५० वरून ८० रुपये, पालक २० रुपयांवरून १०० ते १२० रुपये, पत्ताकोबी ३० वरून ४० ते ५० रुपये तर लसणचे भाव ५० ते ६० रुपयांवरून १२० रुपये, मेथी ४० ते ५० वरून १०० ते १२० रुपये आणि बीटचे भाव ४० रुपयांवरून दुपटीवर अर्थात ८० रुपयांवर पोहोचले आहेत. आल्याच्या भावात तिप्पट वाढ झाली असून भाव ८० ते १०० वरून २०० रुपयांपर्यंत पोहेचले आहेत. किरकोळमध्ये कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, शिमला मिरची आदींची आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. गुरुवारी किरकोळ बाजारात वांगे ८० ते १०० रुपये किलो, कांदे ३५ ते ४०, फूलकोबी ८० ते १००, पत्ताकोबी ४० ते ५०, आले १९० ते २००, लसूण १२०, बिन्स शेंगा १६० ते २००, गवार शेंग ८०, बीट ८०, पालक भाजी १०० ते १२०, मेथी १०० ते १२० रुपये भाव होते.

चवळी शेंगचे भाव कमी२० दिवसांपूर्वी किरकोळ आवक कमी झाल्यानंतर बाजारात चवळी शेंगाचे भाव १२० रुपये किलोपर्यंत वधारले होते. पण पाऊस थांबल्यानंतर आवक वाढली. त्यामुळे किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

आले व लसूणची आवक कमीसध्या किरकोळ बाजारात आले १८० ते २०० रुपये प्रति किलो भाव आहेत. १५ दिवसापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. आवक बेंगळुरू आणि छिंदवाडा येथून होते. पण सध्या बेंगळुरू येथून आवक आहे. पण आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. लसूण राजस्थानातून येतो. पण तेथूनही आवक कमी आहे.

बाहेरून आवक कमीपावसामुळे नागपूरलगतच्या भागातून आवक बंद झाली. केवळ एक वा दोन टक्के शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक आहे. अन्य शेतकरी शेतीच्या कामात गर्क आहेत. त्यामुळे भाज्यांची आवक कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशसह नाशिक, औरंगाबाद, धुळे, यवतमाळ, संगमनेर, जळगांव आदी शहरांवर अवलंबून आहे. ही राज्ये आणि शहरामध्ये पावसाळ्यातही उत्पादने चांंगले आहे. उत्पादक नागपूरसह अन्य राज्यातही भाज्या विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागपुरात पुरेशी आवक नाही. याच कारणामुळे भाव वधारले आहे.आॅक्टोबरनंतर होणार भाव कमीभाज्यांची आवक अन्य शहरांवर अवलंबून आहे. पण अन्य शहरांतूनही भाज्या कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. आॅक्टोबरनंतर नागपूरलगतच्या भागातून आवक सुरू होईल. त्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता आहे. अन्य शहरांतून आवक वाढल्यानंतरही भाव कमी होत नाहीत.- राम महाजन, सचिव, महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशन.नवीन उत्पादनाअभावी कांदे महागनवीन उत्पादनाअभावी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. बाजारात जुने कांदे विक्रीस आहे. जानेवारीनंतरच नवे उत्पादन बाजारात येईल.

टॅग्स :vegetableभाज्या