शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  भाजी आता 'फार्म टू होम' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 20:39 IST

कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा पुढाकार : ५० शेतकरी गटांचा केला समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजीबाजारातील गर्दी ही प्रशासनासाठी चांगलीच डोकेदु:खी ठरली आहे. मुख्य बाजारपेठेचे विलगीकरण करूनसुद्धा बाजारातील गर्दी कमी होताना दिसत नाही. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आहे.कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न होत आहे. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे. पण भाजीबाजारात होत असलेल्या गर्दीमुळे त्याचा फज्जा उडताना दिसतो आहे. भाजीबाजारांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्तांनी शहरातील मध्यवर्ती कॉटन मार्के ट बाजार बंद केला. यानंतर शहरातील विविध नऊ झोनमध्ये मोकळ्या मैदानात भाजीबाजार भरविला. मात्र, याही ठिकाणी नागरिकांकडून गर्दी झाली. भाजीबाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले मात्र, त्यावर पूर्णत: नियंत्रण मिळविता आले नाही. भाजीबाजारात होणारी गर्दी लक्षात घेता कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ‘फार्म टू होम’ची संकल्पना राबविण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे व कृषी उपसंचालक उपरीकर यांच्या नेतृत्वात शहरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांशी चर्चा करण्यात आली. ५० गटांनी यासाठी होकार दर्शविला. यानंतर गत २७ मार्चपासून या शेतकरी गटांनी शहरातील मनपाच्या दहाही झोनमधील विविध वस्त्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या घरी शेतातील ताजा भाजीपाला/फळे, फिरते भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला.कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आज हे फिरते भाजीपाला विक्री केंद्र शहरवासीयांना ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री’ (फार्म टू होम) या तत्त्वावर उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी/योग्य भावाने त्यांच्या घरापर्यंंत ताजा भाजीपाला व फळे मिळत आहेत. गर्दी टाळा एवढीच अपेक्षाघराबाहेर पडून शहरात गर्दीच्या ठिकाणांहून भाजीपाला घेण्याऐवजी आपल्या वस्त्यांमध्ये येऊन भाजीची विक्री करणाऱ्या शेतकरी गटांकडून भाजीपाला विकत घ्यावा व बाहेर होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेतीnagpurनागपूर