शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

महालातील वझलवार वाड्याने अनुभवला ‘त्यांचा’ रियाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:25 IST

महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल भागात असलेल्या वझलवार वाड्याच्या अनुषंगाने नागपूरकरांना त्यांच्या रियाजाचा आनंद घेता आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल भागात असलेल्या वझलवार वाड्याच्या अनुषंगाने नागपूरकरांना त्यांच्या रियाजाचा आनंद घेता आला आहे.महालातील शुक्रवारी तलावाच्या काठावर राहत असलेल्या वझलवार घराण्यातील गिरीश वझलवार हे त्यांचे पहिले शिष्य होते आणि पट्टशिष्य म्हणून जसराजांनी त्यांना स्रेह दिला. गिरीश वझलवारही आज हयात नाहीत. मात्र, त्याच नात्याने पं. जसराज जेव्हा केव्हा नागपुरात येत असत, तेव्हा त्यांची व्यवस्था याच वझलवार वाड्यात असायची. वझलवारांचे तेथेच ‘लेक व्ह्यू’ नावाचे लॉज होते. खास जसराज यांच्यासाठी एक स्पेशल खोलीही तयार करण्यात आली होती. मैफिल, नादब्रह्म, सप्तक या संस्थांद्वारे त्यांच्या नागपुरात नेहमी संगीतसभा घेतल्या जात असत. ते नागपुरात आले की याच वाड्यात त्यांच्या रियाजाची मैफिल रंगायची आणि मुख्य कार्यक्रमाआधीच त्यांच्या रचनात्मक स्वरांचा परिचय नागपूरकरांना होत होता. त्यावेळी नागपुरातल्या मैफिलींमध्ये नागपूरचे प्रसिद्ध तबलावादक गोपालराव वाडेगावकर व महेश वझलवार यांनी संगत केली आहे. आज त्यांच्या जाण्याने या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.‘नादब्रह्म’चे उद्घाटनगिरीश वझलवार यांचे लहान बंधू महेश वझलवार हे तबलावादक होते. ते मुंबईत नोकरीला असताना गिरीश यांच्यामुळे जसराज यांच्याघरी त्यांचे जाणे-येणे असायचे. जसराजही महेश यांच्याकडे येत असत. महेश यांनी नागपुरात ‘नादब्रह्म’ ही संस्था सुरू केली होती. या संस्थेचे उद्घाटन पं. जसराज यांनीच केले होते आणि त्याप्रसंगी नागपुरातील पहिली मैफिल ‘लेक व्ह्यू’ लॉजमध्ये रंगल्याची आठवण महेश वझलवार यांनी सांगितली.सप्तकने चार मैफिलींचे केले होते आयोजनशहरातील प्रसिद्ध संगीत संस्था सप्तकनेही पं. जसराज यांच्या चार मैफिलींचे आयोजन केले होते. ११ ते १३ जानेवारी १९८९ रोजी कै. एस.बी. बर्वे संगीत महोत्सव, ११ ते १३ ऑक्टोबर १९९० रोजी दशकपूर्ती समारोह संगीत महोत्सव, ९ ते ११ जानेवारी १९९५ रोजी लॉईड संगीत महोत्सव व ६ ते ७ फेब्रुवारी १९९७ रोजी सप्तक संगीत महोत्सवात पं. जसराज यांना नागपुरात विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय, त्यांच्या अनेक मैफिली नागपुरात रंगल्या आहेत.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर