शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

बदलते रूप : मेळघाटातील बांबूपासून सव्वा लाख राख्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:38 IST

एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.

ठळक मुद्देरोजगारातून सन्मानासाठी बांबू केंद्राचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर मेळघाटला अनुदानाच्या खिचडीची गरज पडणार नाही, असा विश्वास संपूर्ण बांबू केंद्राचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी येथे झालेल्या मीट द प्रेसमध्ये व्यक्त केला.देशपांडे म्हणाले, मेळघाटात ३१७ गावे आहेत. तीन लाख लोकसंख्येमध्ये एक लाख ८० हजार तरुण आहेत. 

मेळघाटच्या या युवा सामर्थ्यांचा उपयोग सकारात्मक कार्यात झाला तर काय साध्य होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे बांबूपासून तयार झालेल्या राख्या आहेत. मेळघाटात फक्त कुपोषणच नाही. येथे दरवर्षी सहा हजार बालके जन्मास येतात. पण कुपोषणाचे शिकार होणारे फक्त ४०० असतात. उर्वारित ५,४०० बालके याच वातावरणात जगतात, तेच अन्न खातात, तरीही सक्षमपणे जगतात हे देखील लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.रोजगारनिर्मितीसाठी बांबूपासून राख्या निर्मितीच्या  प्रयोगाबद्दल ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून या राख्या तयार होत आहेत. यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री प्रकल्पाच्या माध्यमातून मेळघाटच्या जंगलात पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमाने ४० देशात ही राखी पोहचली आहे. मागील वर्षी मेळघाटातील महिलांनी पंतप्रधानांच्या हातावर या राख्या बांधल्या होत्या.बांबू धोरण सकारात्मक करण्यात मेळघाटचा मोठा वाटा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. २०१७ मध्ये राज्य सरकारने बांबू धोरण तयार केले. १९२७ चा वनकायदा बदलला. त्याचा सकारात्मक परिणाम येथे दिसत आहे. मेळघाट आपले रूप बदलत असून, हागणदारीमुक्त गावासोबत बाथरूमयुक्त गाव ही संकल्पना चित्री या गावात साकारली आहे. आसाम, झारखंड या राज्यांसह पनवेल, किनवट, नागपूर या क्षेत्रातही कार्य सुरू झाले आहे. मेळघाटातील खामदा, किनीखेडा, कुंड, खोपमार, राक्षा ही पाच गावे सोलरयुक्त झाली आहेत. यामुळे मेळघाटची ओळख यापुढे सन्मानजनक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळघाटला कॉमन फॅसिलिटी सेंटरची नव्हे तर डिझाईन्स स्टुडिओंची जागोजागी गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे अनिल गाडेकर, संपूर्ण बांबू केंद्राचे सचिव सतीश घाणेकर, चंदा कनोजे, अनिता सेलूकर उपस्थित होते.बांबू केंद्राने परिवर्तन घडविले : चंदा कनोजेआपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात बांबू केंद्राने परिवर्तन घडविल्याचे मनोगत चंदा कनोजे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही भीलाला समाजातील. मुलगी म्हणून जगताना समाजाची बंधने अनेक. तरीही दहावी नापास असतानाही केंद्राने सन्मानाचे काम दिले. आईवडिलांनी परवानगी दिली. आज संगणक चालविते, टॅलीचे काम करते, एवढेच नाही तर प्रकल्पाच्या कामासाठी विमान, रेल्वेने प्रवास करते. पंतप्रधानांच्या हातावर राखी बांधण्याचे सौभाग्यही आपणास मिळाले. आयुष्यातील हे परिवर्तन संपूर्ण बांबू केंद्रामुळे घडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MelghatमेळघाटRakhiराखीMediaमाध्यमे