शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:56 IST

विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले.

ठळक मुद्देनागपुरातील जनतेने विधानसभेतही नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडीने मागील दोन-एक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एक वादळ निर्माण केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोंची गर्दी पाहता, ही वंचित एक नवीन राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल, असे भाकीत वर्तविले जाऊ लागले. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे काहिसे पडसाद पाहायला मिळाले. त्यामुळे विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले.काही महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखावर मते घेतली. औरंगाबाद येथील एमआयएमचा उमेदवार निवडूनही आला. राज्यात तब्बल ४१ लाखावर मते वंचितच्या उमेदवारांना मिळाली. नागपूरचा विचार केला तर नागपूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे यांना २६,१२८ मते मिळाली होती तर रामटेकमधून किरण रोडगे (पाटणकर) यांनी ३६,३४० मते घेतली. दोन्ही उमेदवारांची मते मिळून एकूण ६२,४६८ मते वंचितला मिळाली. वंचितच्या राज्यातील इतर उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत ही मते खूपच कमी होती. एकूणच लोकसभा निवडणुकीत नागपुरातील मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना नाकारले होते. विधानसभेतही तेच चित्र पाहायला मिळाले. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नागपूर पश्चिम मतदार संघ वगळता सर्व ११ विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. या सर्वांना मिळून ६६,५९० मते मिळली. जवळपास लोकसभेत मिळालेल्या मतांएवढीच ही मते आहे. यात केवळ ४ हजार मतांची वाढ झाली इतकेच. यात सर्वाधिक १५,३७१ मते हिंगणा मतदार संघातून नितेश जंगले यांनी घेतली. त्यानंतर कामठीमधून राजेश काकडे यांनी १०,६०१, तर दक्षिण-पश्चिममधून रवी शेंडे यांनी ८८२१ मते घेतली. नागपूर दक्षिणमधून रमेश पिसे यांनी ५५८३, नागपूर उत्तरमधून विनय भांगे यांनी ५५९९, नागपूर पूर्वमधून मंगलमूर्ती सोनकुसरे यांनी ४३३८, काटोलमधून दिनेश टुले यांनी ५८०७, रामटेकमधून भगवान भोंडे यांनी २२६७, सावनेरमधून १७५० आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ५९३१ मते घेतली.एमआयएम सरसखा. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष होता. लोकसभेत त्यांचा एक खासदारही निवडून आला. परंतु विधानसभेत मात्र एमआयएम वंचितमधून बाहेर पडला. नागपूरचा विचार केला तर नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारापेक्षा एमआयएमचे उमेदवार सरस ठरल्याचे दिसून येते. एमआयएमने येथून तीन मतदार संघात आपले उमेदवार उभे केले होते. यात उत्तर नागपुरातून एमआयएमच्या उमेदवार कीर्ती डोंगरे यांनी ९३१८ मते घेतली. येथे वंचितच्या उमेदवाराला केवळ ५५९९ मते मिळाली. मध्य नागपुरात वंचितचे उमेदवार कमलेश भगतकर यांना १६१२ मते मिळाली तर एमआयएमचे उमेदवार अब्दुल शाकीर पटेल यांनी ८५६२ मते घेतली. इतकेच नव्हे तर येथे एमआयएमचे उमेदवार विजयाचे गणित बदलवण्यास कारणीभूत ठरले. केवळ कामठी मतदार संघात वंचितचे राजेश काकडे यांनी १०,६०१ तर एमआयएमचे शाकीबुर रहेमान यांनी ८३४५ मते घेतली. एकूण नागपुरात तरी वंचितपेक्षा एमआयएम सरस ठरल्याचे दिसून येते.

पुन्हा जोमाने काम करूअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात पुढे जात आहे. आम्ही विजय मिळवू शकलो नाही तर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मते मिळत आहे. नागपुरात मात्र अजूनही लोकांचा विश्वास आम्ही संपादित करू शकलो नाही. याबाबत कुठलीही नाराजी नाही. काँग्रेस भाजपच्या धनशक्तीपुढे आम्ही कमी पडलो तरी आम्ही हार मानलेली नाही. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणखी जोमाने काम करू, लोकांचा विश्वास संपादित करण्याचा प्रयत्न करु.रवि शेंडेशहराध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी