शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींनी गाजवली नागपूरची प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:14 IST

अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.

ठळक मुद्देअमेरिकेसह जगालाही दिला होता दम : भाषणादरम्यान अनेकदा साधला मराठीत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अटलबिहारी वाजपयी हे उत्कृष्ट वक्ते होतेच. त्यांनी अनेक प्रचारसभा गाजवल्या. नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरही त्यांच्या ऐतिहासिक सभा पार पडल्या. परंतु २००४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची कस्तूरचंद पार्कवर झलेली प्रचार सभा ही विशेष होती. कारण पंतप्रधान म्हणून त्यांनी या प्रचारसभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर प्रहार केलेच. परंतु भारत कुणासमोरही झुकणार नाही असा दम थेट अमेरिकेसह संपूर्ण जगालाही नागपुरातूनच दिला होता.२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नागपूर-कामठी लोकसभा मतदार संघातून भाजपने अटलबहादूर सिंग यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. अटलबहादूर सिंग यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी तेव्हा नागपूरला आले होते. १६ एप्रिल २००४ रोजी कस्तूरचंद पार्कवर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अशी ठरली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर प्रहार केले. भाजपाने केलेल्या कामांचे वर्णन करीत चांगल्याला चांगले म्हणण्याची हिंमत ही आजच्या काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेस अमेरिकेच्या दबावापुढे झुकली, परंतु आम्ही संधी मिळताच अणूस्फोट घडविला, असे सांगत आपण अमेरिकेपुढे झुकणार नाही, असे स्पष्ट केले.वाजपेयी यांनी भाषणामध्ये मधूनमधून मराठी शब्दांचा वापर केला. त्यांनी भाषणाची सुरुवातच ‘नागपूर आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना मनापासून नमस्कार’ अशी केली. गंगेवरील कवितेसोबत आपण नेहरूंची प्रशंसा केली तर आपल्याला नेहरूवादी म्हणतात, कोण आहे नेहरूवादी? बोडखं तुमचं’ असे वाजपेयी म्हणताच हास्याची कारंजी उडाली. आपल्या सरकारमधील काही लोक गडबड करायचे, असे सांगून वाजपेयी म्हणाले होते, की त्यांना मी तुम्ही जास्त गडबड करू नका असे मराठीत संगितले की, ते ऐकत असत.भाषण संपवून जागेवर बसण्यापूर्वी वाजपेयी यांनी नागपूरचे उमेदवार अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले आणि म्हणाले ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंग ही’ वाजपेयींच्या या वाक्यावर साºयांनीच हसून दाद दिली.‘इंग्रजांना माफीनाफा’बाबत खुलासा अन् खंतअटल बिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत पकडले गेले असता इंग्रजांना माफीनामा लिहून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली होती. म्हणून ते दशभक्त नसून देशद्रोही आहेत, असा आरोप नेहमी केला जातो. त्या काळातही हा आरोप केला गेला. त्यासंदर्भात वाजपेयी यांनी नागपूरच्याच जाहीर सभेत त्याचे उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले की, ‘शालेय जीवनात आपण स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी झालो होता. पण खोल्या जाळल्याचा आरोप करून आम्हा दोन भावांना अटक करण्यात आली. त्यात आम्ही नव्हतो. हे सिद्ध झाल्यावर पोलिसांनी आम्हाला सोडले,’ असा खुलासा वाजपेयी यांनी तेव्हा केला होता. आम्ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावर आज आहोत. म्हणून मुद्दाम हा मुद्दा उचलला जात आहे. देशभक्त असल्याचे सिद्ध करावे लागत असेल तर देशात राहण्याचा कुठलाही आनंद नाही. माझ्या मनाला अशा आरोपांमुळे वेदना होतात. इच्छा होते की, निवडणूकच लढवू नये, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. पण आपण मैदान सोडणार नाही, असेही ठणकावून सांगितले होते.इंदिराजींना ‘दुर्गा’ म्हटले नसल्याचा खुलासाअटलबिहारी वाजपेयी यांनीच इंदिरा गांधी यांना दुर्गा अशी उपमा दिल्याचे नेहमी सांगितले जाते. आपण त्यांना दुर्गा म्हटले नसल्याचा खुलासाही खुद्द वाजपेयी यांनी याच जाहीर सभेत केला होता. त्यांनी सांगितले की, ‘बांगलादेशाच्या युद्धात केलेल्या कामगिरीनंतर इंदिराजींची प्रशंसा केली होती, पण त्यांना दुर्गा म्हटले नव्हते. दुर्गेचे रूप, तिची भव्यता आणि दुर्गेच्या पूजेचा अर्थ आपल्याला चांगला माहिती आहे. इंदिराजींना दुर्गा म्हणणारे दुसरे होते, पण पेपरवाल्यांनी हे वाक्य आपल्या नावावर छापल्याचा’ खुलासा वाजपेयींनी केला.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीnagpurनागपूर