शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण बंदच , दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:03 IST

Vaccination crises केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिकृतपणे बंद आहे. लस उपलब्ध न झाल्याने ज्यांचा लसीचा पहिला डोस होऊन सहा ते आठ आठवड्याचा कालावधी झाला. दुसरा डोस मिळावा म्हणून काहींची धावपळ सुरू आहे. परंतु दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी पहिला डोस घेणारे सुरक्षित असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

ठळक मुद्देचिंता करण्याची गरज नाही: १८ वर्षांवरील लसीकरण तीन केंद्रावर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिकृतपणे बंद आहे. लस उपलब्ध न झाल्याने ज्यांचा लसीचा पहिला डोस होऊन सहा ते आठ आठवड्याचा कालावधी झाला. दुसरा डोस मिळावा म्हणून काहींची धावपळ सुरू आहे. परंतु दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी पहिला डोस घेणारे सुरक्षित असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.

साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. पण आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय चिलकर यांच्या मते, कुठल्याही लसीचा दुसरा डोस कधी घ्यायचा हे ही संशोधकांनी सांगितलेले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत घेतला तरी चालतो. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे वेळ जास्त लागतो आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ज्यांना पहिला डोस दिलाय त्यांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस दिला जाणार आहे.

दोन ते चार आठवड्यात अँटिबॉडी

तज्ज्ञांच्या मते, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. लसीचा पहिला डोस हा रोगाविषयीची प्रतिकारक शक्ती शरीरात जागवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरात अँटिबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटिबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे.

मंगळवारी लसीकरण बंद

शहरातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे मंगळवारी लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये व स्व.प्रभाकरराव दटके, महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्या जाईल.

१८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरु

१८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नागपूर शहरातील लसीकरण (३ मे पर्यंत)

पहिला डोस

आरोग्यसेवक - ४३३७९

फ्रंटलाइन वर्कर - ४७५४३

१८ वर्षांवरील ९३२

४५ वर्षांवरील - १०३४४४

४५ वर्षांवरील आजारी - ७५८६३

६० वर्षांवरील - १६१०२५

एकूण - ४३२१८५

दुसरा डोस

आरोग्यसेवक - २०६११

फ्रंटलाइन वर्कर - १३००५

४५ वर्षांवरील - १२३९८

४५ वर्षांवरील आजारी - १०४६४

६० वर्षांवरील -४६०५५

दुसरा डोस एकूण-१०२५३३

एकूण लसीकरण - ५३४७१८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसnagpurनागपूर