शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृद्धांचे लसीकरण संकटात, साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 22:25 IST

Vaccination in crisisलसीकरणाच्या भराेशावर कोरोनावर मात करण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकार करीत आहे. परंतु नागपूर शहरात लसीचा साठाच संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरात ४० ते ५० टक्के केंद्रांवर फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले. सुत्रांनुसार मनपाकडील लसीचा साठा संपलेला आहे. लसीच्या पुरवठ्यासाठी ते आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देतरीही ३ केंद्रांवर १८ वर्षांवरील युवकांच्या लसीची तयारी

लेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीकरणाच्या भराेशावर कोरोनावर मात करण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकार करीत आहे. परंतु नागपूर शहरात लसीचा साठाच संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरात ४० ते ५० टक्के केंद्रांवर फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले. सुत्रांनुसार मनपाकडील लसीचा साठा संपलेला आहे. लसीच्या पुरवठ्यासाठी ते आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे  लक्ष ठेवून आहेत. गुरुवारपर्यंत नागपूर महापालिकेकडे केवळ तीन ते साडेतीन हजार लसीचे डोस उपलब्ध होते. त्यामुळे शुक्रवारी अनेक केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशी परिस्थिती असूनही नागपुरात १ मेपासून १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या लोकांचे लसीकरण करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी तीन केंद्र बनवण्यात आली आहेत. ही केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, पाचपावली महिला रुग्णालय आणि आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा अशी आहेत. विशेष म्हणजे १८ वर्षांवरील लोकांना देण्यात येणाऱ्या लसीचे डोस अजूनपर्यंत मनपाला मिळालेले नाहीत. असे सांगितले जाते की, शनिवारी सकाळी तिन्ही केंद्रांना हे डोस उपलब्ध करून दिले जातील. १ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळात संबंधित वयातील लोकांना लस टोचली जाईल. त्यानंतर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात लसीकरण होईल.

अधिकाऱ्यांचे मौन

मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लसीच्या साठ्याबद्दल विचारणा करण्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. फोनसुद्धा उचलला नाही. मोबाईलवर मेसेज पाठविल्यानंतरसुद्धा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनीसुद्धा प्रतिसाद दिला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन आऊट ऑफ कवरेज होते. यावरून हे स्पष्ट होे की, मनपाकडे असलेला साठा संपला आहे. परंतु कुणी बोलायला तयार नाही, असे असूनही १८ वर्षांवरील लसीकरणाची तयारी सुरु असून, महापौर व मनपा आयुक्तांनी तरुणांना लस लावून घेण्याचे आवाहन केले आहे.

रजिस्ट्रेशनमध्ये येताहेत अडचणी

१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणाला १ मेपासून सुरुवात होत आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. काही दिवसांपासून रजिस्ट्रेशन सुरु आहे. परंतु कोविड ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास अडचणी येत आहेत.

लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत : महापौर

यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. लस किती आहे, हे तर अधिकारीच सांगू शकतील. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण शनिवारपासून सुरु होत आहे. त्यांच्यासाठी लस उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसnagpurनागपूर