मनपा केंद्रांमध्ये आज ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:14+5:302021-07-12T04:07:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे महापालिकेसह शासकीय केंद्रावर सोमवारी फक्त ...

Vaccination of citizens above 45 years of age in Municipal Centers today | मनपा केंद्रांमध्ये आज ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

मनपा केंद्रांमध्ये आज ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे महापालिकेसह शासकीय केंद्रावर सोमवारी फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोविशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला होता त्यांना दुसरा डोस देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी १० पासून मर्यादित स्वरूपात केले जाईल. सध्या नागपूर मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशिल्ड, तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे.

१८ व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे, तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरसुद्धा ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी १० वाजता सुरू होईल.

Web Title: Vaccination of citizens above 45 years of age in Municipal Centers today