नागपूर : मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये लसीकरण केंद्र असावे या अनुषंगाने शनिवारी नेहरू नगर झोन अंतर्गत दिघोरी हेल्थ पोस्ट जिजामाता नगर आणि ताजबाग हेल्थ पोस्ट या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती विजय झलके, आरोग्य सभापती महेश महाजन, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे उपस्थित होते. त्यानंतर महेश महाजन यांनी मनपा मुख्यालयात असलेल्या कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली. नियंत्रण कक्षाचा क्रमांकावरून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्या, रुग्णालयातील रिक्त बेड्सची माहिती द्या, असे निर्देश दिले. झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र आणि मनपा शाळेत चाचणी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणांची त्यांनी पाहणी करून झोनल आरोग्य अधिकारी आतिक खान यांना निर्देश दिले.