वाडी : नजीकच्या लाव्हा (ता. नागपूर ग्रामीण) येथे शुक्रवारपासून (दि. २६) काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच विशिष्ट आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे.
लसीकरणाचा शुभारंभ सरपंच ज्याेत्स्ना नितनवरे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर बर्वे यांना लस देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच महेश चोखांद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे, आरोग्यसेविका रंजना बांबल, ग्रामविकास अधिकारी विकास लाडे, मंगेश खोरगडे, विजय बर्वे, दीपक लोखंडे, आकाश चोखांद्रे, ज्ञानेश्वर वानखडे, धनराज देवासे, राजकुमार बर्वे, विजय मेश्राम,शालू बर्वे, प्रतीक डवरे, अभिनव पांडे, वनिता देवासे, नंदा बर्वे, आरोग्य सहायक मधुकर माकडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष डोईफोडे, सुनील वानखडे, आशीर्वाद पाटील, सारिका सलामे, रामकृष्णा धुर्वे, शेषराव लोणारे, चरण धोंगडे आदी उपस्थित होते.