राजेश शेगोकार
नागपूर: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांना यंदाचा स्वातंत्रवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार घोषीत झाला आहे. मुंबईच्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. रुपये पंचवीस हजार आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या २५ मेला हा पुरस्कार मुंबईत देण्यात येईल.
डॉ. जोग हे नावाजलेले भाष्यकार म्हणून ओळखले जातात. गरुडझेप आणि सावरकर आंबेडकर विचार समीक्षा ही त्यांची पुस्तके खूप गाजली. चित्रपट समीक्षा, कथा, कादंबऱ्या, वैचारिक समीक्षा अश्या स्वरूपाची त्यांची छत्तीस पुस्तके आहे. नागपूरात स्वातंत्रवीर सावरकर यांचा पुतळा उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते मराठीचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि प्राचार्य आहेत.