शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नागपुरात आपली बसमध्ये बोगस पासचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:23 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या पासधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु पासचा कालावधी संपला तरी संबंधित पासधारक प्रवास करत असल्याचा प्रकार परिवहन सभापती कार्यालयातील पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत उघडकीस आला. पास उपलब्ध करण्याची तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टीम लिमिटेड (डिम्ट्स) कंपनीवर आहे. परंतु याक डे कंपनीचे दुर्लक्ष असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

ठळक मुद्देपथकाच्या धाडीत मुदत संपलेल्या पासेस जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या पासधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. परंतु पासचा कालावधी संपला तरी संबंधित पासधारक प्रवास करत असल्याचा प्रकार परिवहन सभापती कार्यालयातील पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत उघडकीस आला. पास उपलब्ध करण्याची तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टीम लिमिटेड (डिम्ट्स) कंपनीवर आहे. परंतु याक डे कंपनीचे दुर्लक्ष असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.पासधारकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. यावर पास दिल्याच्या तारखेची नोंद केली जाते. मात्र, कंपनीने दिलेल्या पासेसवर ती कुठल्या तारखेपर्यंत वैध आहे याची नोंद नाही. परिणामी पासची मुदत संपली की सुरू आहे, याची माहिती मशीनद्वारेच होते. पासधारकांचे वाहकाने तिकीट काढणे आवश्यक आहे. ज्या पासची मुदत संपलेली असते वा कनेक्टिव्हीटी नसते, अशा वेळी संबंधित पासचे मशीनमधून तिकीट निघत नाही. मुदत संपलेल्या पासवर विद्यार्थी व पासधारक प्रवास करीत असल्याचा प्रकार पथकाच्या निदर्शनास आला. चार जणांच्या पासेस जप्त क रण्यात आल्या. पास उपलब्ध करण्याची व तसेच तिकीट तपासणीसाठी निरीक्षक नियुक्त करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र निरीक्षकांकडून तिकीट तपासणी होत नसल्याने मुदत संपलेल्या पासचा सर्रास वापर सुरू असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.विद्यार्थ्यांना शहर बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने सवलतीच्या दरात मासिक पास योजना सुरू केली. पासेस देण्याची व्यवस्था डिम्टस् कंपनीकडे आहे. मात्र, कंपनीने शहर बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ दाखवून महापालिकेकडून कोट्यवधी रुपये अधिक वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या डाट्यात घोळपरिवहन विभागाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पासेसचा मुद्दा समोर आला होता. कंपनीला याबाबत अहवाल मागितला आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. परंतु याचा डाटा कंपनीकडे उपलब्ध नाही. यात घोळ असल्याची माहिती आहे. बोगस पासचा वापर होत नसल्याचा दावा परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी केला होता. मात्र मंगळवारी पथकाने बोगस पास पकडल्याने त्यांचा दावा खोटा ठरला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक