शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

होलिकादहन, धुळवडसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:29 IST

होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या ह्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील, होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा, ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या, विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.होळीच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फटका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, बेधुंद वाहन चालकांमुळेही अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नियोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, उत्सवप्रिय जनतेच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना टाळून त्यांना होळीचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यत उडणार नाही याची काळजी घ्या. रंग भरलेले फुगे फेकताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाही याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेचे रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतारावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा संभाव्य धोका असल्याने विजेचा खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात होळी खेळताना वीज मिटर, विजेचे प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा, ओल्या हाताने विजेच्या बटनांना स्पर्श करू नका. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता २४ तास सुरू असणारे नि:शुल्क क्रमांक १९६१२, १८००२३३३४३५ किंवा १८००१०२३४३५ यावर संपर्क साधावा, असेही महावितरणने म्हटले आहे.

अशी घ्या काळजीवीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा.होळी आणतांना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा करु नका.

टॅग्स :Holiहोळी