शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

मास्क वापरा अन्यथा हजार रुपये दंड करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 10:54 IST

Nagpur News Mask corona नागपूर शहरातील मास्क न वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड केला जाईल.असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचा इशारामास्क न वापरणाऱ्यांकडून ९१ लाख दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाशी लढा देताना हलगर्जीपणा नको, नागरिकांनी अधिक सतर्क राहून कोविड संदभार्तील दिशानिदेर्शांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु अजूनही अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अन्यथा नागपूर शहरातील मास्क न वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड केला जाईल.असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दिल्ली शहरात मास्क न वापरणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड केला आहे. औरंगाबाद शहरात मास्क न वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवली जात आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे मास्क वापरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे. शहरातील अनेक दुकानदार व बेजबाबदार नागरिक मास्क न वापरता फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करणार का, असा प्रश्न मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना केला असता ते म्हणाले, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत ९१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. असे असतानाही नागरिकांच्या वर्तनात बदल न झाल्यास नागपूर शहरातही दंडाची रक्कम एक हजार रुपये केली जाईल.असे संकेत त्यांनी दिले.२१४७९ लोकाकडून ९१ लाख वसूलसुरुवातीला नागपूर शहरातील मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता १५ सप्टेंबरपर्यंत मास्क न वापरणाऱ्या ५४७० लोकांकडून १० लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर २६ नोव्हेंबर पर्यंत ५०० रुपये प्रमाणे १६ हजार ९ लोकांकडून ८० लाख ४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला अशाप्रकारे २१ हजार ४७९ लोकांकडून ९० लाख ९८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस