शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करा; कॅटचे ग्राहकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 10:59 IST

Diwali, Nagpur News भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देयंदा दिवाळी छोट्या कारागिरांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारत-चीन वादात यंदा दसरा आणि दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांसाठी आर्थिक फायद्याची ठरणार असल्याचे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्त केले आहे. सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीय आत्मनिर्भर बनणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर अभियानाला स्थानिक स्तरावर प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय कॅटने घेतला आहे. १० जूनला चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यावर्षी राखी आणि गणेश चतुर्थी सणात लोकांनी चिनी वस्तूंचा बहिष्कार करीत भारतीय वस्तूंची खरेदी केली. दिवाळी सणातही भारतीय सजावटीच्या वस्तूंची ग्राहकांना विक्री करण्यास व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. गेल्यावर्षी चीनने भारतीय सणांमध्ये बाजारावर ताबा मिळविण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. पण आता भारतीय व्यापाऱ्यांनी सणांमध्ये बाजारपेठा चिनी वस्तूमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यातच भारतीय वस्तू, माझा अभिमान या कॅटच्या अभियानाचा व्यापारी हिस्सा बनले आहेत. चीन दरवर्षी सणांमध्ये भारतात जवळपास ४० हजार कोटींच्या वस्तूंची निर्यात करते. पण कॅटच्या अभियानाने चीनला या वस्तूंच्या निर्यातीवर पाणी सोडावे लागले आहे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, या अभियानांतर्गत यावर्षीच्या सणांच्या दिवसात कॅटने दिल्लीसह संपूर्ण देशात ३५० क्लस्टर नव्याने उदयास आणले आहेत. दिवाळी सणांमध्ये पूजा आणि दुकान व घरांच्या सजावटीच्या वस्तू याच क्लस्टरमधून मिळणार आहेत. या वस्तूंमध्ये भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती दिसेल. यामध्ये मातीपासून तयार केलेले कलात्मक व पेंट केलेले दिवे, दारावर लावण्यात येणारी माळ, झुंबर, लक्ष्मीचे पाय, शुभ-लाभाचे चिन्ह, सजावटी झालर, हँगिंग, खादीपासून तयार सजावटी वस्तू, मोती, बीडपासून तयार वस्तू, मधुबनी व मैथिली पेंटिंगसह अनेक वस्तूंचा समावेश आहे. पूवीर्ही अशा वस्तू देशात तयार व्हायच्या, पण त्यांना बाजारपेठ मिळत नव्हती. आता कॅटने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. या वस्तू व्हॉट्सअ?ॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत व्यापारी आणि लोकांनी न्याव्यात, असे आवाहन कॅटने केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी