शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कुलर वापरा पण सावधगिरीने; दुर्लक्ष केल्यास जावू शकतो जीव

By आनंद डेकाटे | Updated: April 5, 2024 14:31 IST

योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूरसह संपुर्ण विदर्भात ऊन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे, तापमानाचा पारा सातत्त्याने वर-वर जात आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी घरोघरी व कार्यालयांतून कुलरचा वापर सुरु होत आहे. कुलर वापर करतेवेळी काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आणि योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्या घरातील कुलर मृत्यूचे कारण बनू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये कूलरचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

कूलर लावण्यापूर्वी घरातील अर्थिंग सक्षम असल्याची चाचणी अधिकृत कंत्राटदार किंवा इलेक्ट्रिशियनकडून करून घ्यावी, अर्थिंग व्यवस्था योग्य नसल्याने अशा घटना घडतात. याशिवाय बाजारात आयएसआय मार्क नसलेले ‘लोकल’ कूलर विक्रीला आहेत. अशा कूलरमुळेही विजेचा शॉक लागण्याचा धोका आहे. विजेचा धक्का हा जीवघेणाच असतो. पण, पुरेशी खबरदारी घेतली तर विजेच्या धक्क्यामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो, घरात ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेक’ (ईएलसीबी) हे उपकरण बसविले तर जीव वाचू शकतो. हे उपकरण असल्यास अपघाताच्यावेळी वीजपुरवठा खंडित होतो व जीव वाचतो.

अशी घ्या काळजी...- कूलरच्या बॉडीला अर्थिंग जोडलेली आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्या.- कूलरची वायरिंग योग्य आणि त्रुटीमुक्त असल्याची खात्री करा.- कूलरचा स्विच बंद करून व प्लग सॉकेटमधून बाहेर काढूनच पाणी भरावे.- घरातील वीजसंच मांडणीला ई.एल.सी.बी. किंवा आर.सी.सी.बी. ही उपकरणे जोडण्यात यावीत.- कूलर सुरू असताना त्यात करंट येत असल्याचे लक्षात आल्यास तो त्वरित बंद करून त्याची चाचणी करूनच पुन्हा लावावा किंवा अशा नादुरुस्त कूलरचा उपयोग करू नये.- ओल्या हाताने कुलर हाताळु नका.- जोड असलेल्या वायरने कूलरला वीजपुरवठा देण्यात येऊ नये. त्याकरिता अखंड वायर वापरण्यात यावा.- कूलर चालू करण्यापूर्वी, पॉवर कॉर्ड आणि प्लग मध्ये कोणतीही खराब झालेली भाग नाही याची खात्री करा.- कूलरला नेहमी एका स्वतंत्र पॉवर सॉकेटवर लावा.- लहान मुलांना कूलरपासून दूर ठेवा.- पावसाळ्यात कूलर वापरणे टाळा

टॅग्स :Heat Strokeउष्माघात