शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात फळ पिकविण्यासाठी चायना पावडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:24 IST

कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही.

ठळक मुद्देकॅल्शियम कार्बाईडच्या जागी फळांच्या पेट्यांमध्ये चायना पावडरच्या पुड्यागेल्या आठवड्यात एफडीएने घेतले सॅम्पल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही. तरीसुद्धा अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी चायना पावडरने पिकविलेली फळे सेवन केल्याने आरोग्यास धोका होत नसल्याचा दावा करीत आहे. परंतु एफडीएने पाच दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने कळमना बाजारातील काही फळ विक्रेत्यांकडून चायना पावडर व पिकविण्यात आलेल्या फळांचे सॅम्पल घेतले. हे सॅम्पल एफडीएने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहे.लोकमतला चायना पावडरमुळे फळ पिकविण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासंदर्भात लोकमतच्या टीमने शुक्रवारी कळमना फळ बाजारात सर्व्हे केला. तिथे आंब्याची छाननी केल्यानंतर आंबे प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवून चायना पावडरच्या तीन पुड्या टाकण्यात येत होता. काही फळ व्यापारी आंब्याच्या ढिगाऱ्याजवळ बसून छाननी करीत होते. प्रत्येकाजवळ पिवळ्या रंगाचे पॅकीट होते. प्लास्टीकच्या बॉक्समध्ये आंबे ठेवल्यानंतर त्यात पुड्या टाकण्यात येत होत्या. पिवळ्या पाकीटातील साहित्य संपल्यानंतर फळ व्यापाºयांच्या कार्यालयातून पुन्हा पाकीट मागविण्यात येत होते.व्यापारी करताहेत चायनाहून पावडरची आयातसूत्रांच्या मते कळमना बाजारातील एक मोठा फळ व्यापारी चायनातून पावडरची आयात करतो आहे. तो येथे तीन ते चार सब डिलरच्या माध्यमातून फळ विक्रेत्यांना विकतो आहे. किमान १०० रुपये किमतीच्या एका पॅकेटमध्ये चायना पावडरच्या १०० पुड्या असतात.नकली पावडरचीही विक्रीकॅल्शियम कार्बाईडवर प्रतिबंध असल्याने चायना पावडरची मागणी वाढली आहे. हे बघता काही नकली पावडरचे पाकीटसुद्धा विकल्या जात आहे.पावडर आरोग्यास घातक नाहीकळमना बाजारात चायना पावडरपासून आंबे पिकविण्यात येत असल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एम.एस. देशपांडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, कॅल्शियम कार्बाईडद्वारे पिकविण्यात येणाऱ्या फळामुळे कॅन्सरचा धोका होता. यावर्षी करण्यात आलेल्या तपासात बाजारात कॅल्शियम कार्बाईडचा वापर दिसून येत नाही. त्यांनी चायना पावडरमुळे पिकविण्यात येणारी फळ आरोग्यात घातक नसल्याचा दावा केला आहे. परंतु पाच दिवसांपूर्वी विभागाने कारवाई करून, आंबे व पावडरचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये तपासासाठी पाठविले आहे. त्यासंदर्भातील अहवाल अद्यापही प्राप्त व्हायचा आहे. असे असतानाही अधिकारी हे पावडर आरोग्यास घातक नसल्याचा दावा करीत आहे. अनुभवाच्या आधारे हा दावा करीत असल्याचे ते म्हणतात.

टॅग्स :chinaचीनfruitsफळे