शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

US Election 2020: भारतीयांना व्हिसाच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा, सत्तेवर येणाऱ्या सरकारकडे लागले आहे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:42 IST

US Election 2020:हॉस्टन येथील कर्करोग संशोधन केंद्रात कार्यरत मयुर गढीकर यांनी ट्रम्प यांच्यावर भारतीय नागरिक नाराज असल्याचे सांगितले.

- अंकिता देशकर / नीलेश देशपांडे

नागपूर : निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या सरकारद्वारे एच१-बी व्हिसा व अन्य विविध समस्या सोडविल्या जातील, अशी अपेक्षा अमेरिकेतील भारतीयांना आहे. ‘लोकमत’ने अमेरिकेतील काही वैदर्भीय नागरिकांशी संवाद साधून त्यांची भावना जाणून घेतली.  २००० ते २०१८ या काळात अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १५० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेतील परदेशी नागरिकांमध्ये भारतीय द्वितीय स्थानावर आले आहेत. असे असले तरी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.   हॉस्टन येथील कर्करोग संशोधन केंद्रात कार्यरत मयुर गढीकर यांनी ट्रम्प यांच्यावर भारतीय नागरिक नाराज असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, ट्रम्प यांनी एच१-बी व्हिसावर अनेक बंधने आणली आहेत. निवडणुकीनंतर सत्तेवर येणारे सरकार याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. ऑस्टीन येथील वरिष्ठ विश्लेषक आदित्य सरदेशपांडे यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली. ज्यो बायडन जिंकल्यास विदेशी नागरिकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. 

संस्कृती वाचविण्यासाठी कार्य कोरोना संक्रमण योग्य पद्धतीने हाताळले नाही म्हणून, अमेरिकन नागरिक ट्रम्प यांच्यावर नाखूश असल्याची माहिती सॉफ्टवेअर इंजिनियर सुमेध साठे आणि पुष्कर कुलकर्णी यांनी सांगितले.  टेक्निकल ॲनालिस्ट सुदेश केसकर यांनी येणाऱ्या काळात अमेरिकेत मोठे बदल पहायला मिळतील, असे सांगितले.

टॅग्स :US ElectionAmerica Electionnagpurनागपूर