शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:36 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.

ठळक मुद्दे कृषी सभापती म्हणतात, बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांना निवेदन दिले होते व खतांची काळाबाजारी होत असल्याचा आरोपही केला होता. शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटानी दरवर्षी ग्रस्त असतो. यंदा दोन्ही संकटे मानगुटीवर असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने संपूर्ण शेती पाण्यात गेली असता कपाशीसाठी गरजेचे असलेली खतेही उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर विक्रेते खतच उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर ही बाब मान्य नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर कृषी सभापती वैद्य यांनी खताच्या तुटवड्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खापर फोडले. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार मेट्रिक टन अधिकचे खत प्राप्त झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, वर्धा तालुक्यातील सेलू, अमरावतीचा काही भाग येथील शेतकरी नागपूर जिल्ह्यातून खते खरेदी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात खतांची उपलब्धतायुरियाबद्दल बोलताना त्यांनी सांगतले की, गेल्यावर्षी ४५ हजार मेट्रिक टन युरिया मंजूर होता. यंदा ५१ हजार १६० मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. त्यानंतरही आतापर्यंत ५६ हजार १८९ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. त्यात ४५ हजार ४२१ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून अद्याप १० हजार ७६८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी २१ हजार २९० मेट्रिक टन मंजूर होते. त्यात २४ हजार ३६८ मेट्रिक टन उपलब्ध झाले. तर २२ हजार ६३२ मेट्रिक टन विक्री झाली असून १,७३६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर