शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरी नक्षलवादीच मुख्य सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST

शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले. भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआनंदमोहन मिश्रा यांचे मत : भूमकाल संघटनेचे चर्चासत्र

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरी नक्षलवादी हेच नक्षल चळवळीचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत नक्षलवादग्रस्त बस्तर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आनंदमोहन मिश्रा यांनी व्यक्त केले.भूमकाल संघटनेच्या वतीने गुरुवारी उत्तर अंबाझरी रोडवरील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह येथे शहरी नक्षलवादावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर मार्गदर्शन केले. अन्य वक्त्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे व संघटनेचे अध्यक्ष अरविंद सोहनी यांचा समावेश होता.नक्षल चळवळ शहरी नक्षलवाद्यांद्वारे संचालित केली जाते. ते या चळवळीसाठी पैसा, रसद व शस्त्रे पुरवितात. त्यांनी निरागस आदिवासींची डोकी भडकवून सशस्त्र सेना उभी केली आहे. त्या सेनेमार्फत दबाव टाकून व अमानुष अत्याचार करून चळवळीमध्ये नवीन भरती केली जाते. आदिवासी मुळात नक्षलवादी नाहीत. परंतु, छळापासून वाचण्याचा दुसरा पर्याय नसल्यामुळे ते नक्षल चळवळीत सामील होतात. खरे नक्षलवादी अशा भोळ्याभाबड्या आदिवासींना मरण्यासाठी पुढे करतात व स्वत: पळून जातात. अशाआदिवासींविरुद्ध खटले दाखल झाल्यानंतर त्यांना कुणी वाचवायलाही येत नाही. खरे नक्षलवादी कायद्याच्या सापळ्यात अडकल्यानंतर मात्र त्यांची सुटका करण्यासाठी महागड्या वकिलांची फौज उभी केली जाते. परिणामी आधी शहरी नक्षलवाद्यांना संपवले पाहिजे. त्यानंतर जंगलातील नक्षलवादी आपोआप संपतील, असे मिश्रा यांनी पुढे बोलताना सांगितले.अलीकडे कारवाई करण्यात आलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा कोरेगाव भीमातील घटनेशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. त्यांना या घटनेसाठी जबाबदार धरले जात असल्यामुळे प्रकरण कमकुवत झाले आहे. त्यांच्याविरुद्ध पंतप्रधानांना ठार मारण्याचा कट रचण्यासारखे महत्त्वाचे पुरावे आहेत. केवळ याच आधारावर त्यांना शिक्षा केली जाऊ शकते, याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.शहरी व ग्रामीण नक्षलवाद असा भेद करणे चुकीचे आहे. हा भेद करणे हेच राजकारण आहे, असे मत देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले तर, नक्षली चळवळ देशाच्या व समाजाच्या विकासाकरिता घातक ठरत आहे, असे अरविंद सोहनी यांनी सांगितले. संघटनेचे सचिव श्रीकांत भोवते यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर