शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ कार्यकर्ते गडकरींना पाहून आनंदित झाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:43 IST

सर्वांच्या मनात एकच प्रश्न, अचानक ‘त्यांच्या’ प्रकृतीला झाले तरी काय ? चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात प्रतीक्षा अन् मनात काळजी. सुमारे तासाभराची प्रतीक्षा ही त्यांच्यासाठी परीक्षाच घेणारी ठरली. अखेर ‘ते’ आले अन् त्यांना पाहताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांमधील तणाव दूर झाला अन् आनंद पसरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा, प्रेम आणि काळजी अनुभवली.

ठळक मुद्देनेता सुखरुप परतल्याचे समाधान : गडकरींनी मानले हितचिंतकांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वांच्या मनात एकच प्रश्न, अचानक ‘त्यांच्या’ प्रकृतीला झाले तरी काय ? चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात प्रतीक्षा अन् मनात काळजी. सुमारे तासाभराची प्रतीक्षा ही त्यांच्यासाठी परीक्षाच घेणारी ठरली. अखेर ‘ते’ आले अन् त्यांना पाहताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून उपस्थितांमधील तणाव दूर झाला अन् आनंद पसरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा, प्रेम आणि काळजी अनुभवली.राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती कळली अन् कार्यकर्त्यांच्या छातीतच धस्स झाले. ‘आॅल इज वेल’ असल्याचे वृत्त येत असले तरी मनात काळजी कायम होती. आपल्या नेत्याला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणारच नव्हते. गडकरी दुपारी ३ वाजता नागपूरला येणार अशी माहिती मिळताच अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी विमानतळाकडेच धाव घेतली. गडकरी यांचे विमान यायला विलंब झाला अन् संपूर्ण वेळ उपस्थितांमधील चलबिचल वाढली होती. अखेर दुपारी ४.३० च्या सुमारास गडकरी विमानतळाबाहेर आले. एरवी आपल्या स्वागताला कुणीही विमानतळावर यायचे नाही, अशी सूचना गडकरी यांनी अगोदरपासूनच देऊन ठेवल्या आहेत. मात्र शुक्रवारी काळजीपोटी कार्यकर्ते विमानतळावर भेटायला गेले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.सरोज पांडे, भाजप शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे इत्यादी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.आरोग्य तपासणी करणार : गडकरीकार्यक्रमस्थळी जो मंडप टाकण्यात आला होता त्यात योग्य प्रमाणात हवा येत नसल्यामुळे थोडा त्रास झाला. मात्र आता मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शनिवारी संपूर्ण आरोग्य तपासणी करणार आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या व हित चिंतणाऱ्या सर्वांचे धन्यवाद करतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.अन् गडकरी ‘अ‍ॅक्टीव्ह’देखील झालेप्रकृती खराब झाल्याने गडकरी आता काही दिवस आराम करतील व कुठल्याही कार्यक्रमांना जाणार नाही, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र गडकरी शुक्रवारी सायंकाळीच ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाले. खासदार सांस्कृतिक महोत्सवातील ‘तथागत’ महानाट्याला ते जातीने उपस्थित होते. याशिवाय शनिवारीदेखील ते कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून निवासस्थानी येण्याची वेळ दिलेल्या सर्वांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHealthआरोग्य