शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांतमध्ये पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:39 IST

नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावरुन गोंधळ झाला.

ठळक मुद्देऐनवेळी दुसऱ्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभादरम्यान पदकाच्या मुद्यावरुन गोंधळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. एका विद्यार्थिनीला पदक मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी तिच्या इतकेच गुण असलेल्या परंतु वय कमी असलेल्या विद्यार्थिनीला पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुद्यावरुन गोंधळ झाला. तिच्या पालकांनी अतिथींच्या उपस्थितीतच यावर आक्षेप घेत विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.विजयश्री बजाज या हिस्लॉप महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला एम.ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक ९.५९ ‘सीजीपीए’ मिळाल्यामुळे या विषयातील सुवर्णपदकाने तिला गौरविण्यात येईल असे पत्रक विद्यापीठाने तिला पाठविले. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर यादी जाहीर केली होती व तेवढाच ‘सीजीपीए’ असलेल्या राचेल डेनिस पीटर्स या विद्यार्थिनीने त्यावर आक्षेप घेतला. दोन विद्यार्थ्यांना सारखा ‘सीजीपीए’ असल्यास जो विद्यार्थी वयाने लहान असेल त्याला सुवर्ण पदक देण्याचा विद्यापीठाचा नियम आहे. हेच कारण समोर करत विद्यापीठाने राचेल पीटर्स हिला पदक देण्याचे ठरविले. परंतु विजयश्री बजाजला याबाबत कळविण्यातच आले नाही. शनिवारी दीक्षांत समारंभाला ती पालकांसह आली असता तिला ही बाब कळली. विद्यापीठाने तिला आत प्रवेश नाकारल्याने हा तिच्यासोबत अन्याय असून याची माहिती का देण्यात आली नाही, असा संतप्त सवाल तिच्या पालकांनी उपस्थित केला. अखेर कुलगुरूंच्या परवानगीने विशेष बाब म्हणून विजयश्री बजाज हिला विशेष बाब म्हणून सारखा ‘सीजीपीए’ असतानाही पदक देऊन गौरविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आणखी एका विषयात एकाच ‘सीजीपीए’चे तीन विद्यार्थी आहेत. आता त्या विद्यार्थ्यांनादेखील विद्यापीठ पदके देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर