शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आरोग्य केंद्रांचे ‘अपग्रेडेशन’थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:01 IST

टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देपदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्षआरोग्य केंद्रातही सुविधांचा अभावगरीब रुग्णांना कशा मिळणार आरोग्य सुविधा?

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गरीब रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिके चा आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात २०१७ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार टाटा ट्रस्ट राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) शहरातील आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन करत आहे. अत्याधुनिकीकरण करण्यात आलेल्या केंद्रात गरजूंना माफक दरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीककरण करणार आहे. यातील १८ केंद्रांचे अपग्रेडेशन करण्यात आले. परंतु उर्वरित आठ केंद्रांसाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अपग्रेडेशनचे काम थांबले आहे.महापालिकेची तीन आंतररुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटल व पाचपावली सुतिकागृहाचा समावेश आहे. दोन बाह्य रुग्णालये असून यात सदर रोगनिदान केंद्र, महाल येथील रोग निदान कें द्राचा समावेश आहे. सात अ‍ॅलोपॅथी व दहा आयुर्वेदिक, तीन होमिओपॅथी, तीन युनानी दवाखाने आहेत.एक प्राकृतिक चिकि त्सा केंद्र तर एक पंचकर्म चिकि त्सा केंद्र आहे. रुग्णालयांचा व्याप मोठा आहे. परंतु डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. प्रभारी डॉक्टरांच्या बळावर कारभार सुरू आहे. तसेच सुविधांचाही अभाव असल्याने उत्तम दर्जाचे उपचार मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. टाटा ट्रस्टच्या उपक्रमामुळे शहरातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु प्रस्तावित आठ आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. वास्तविक टाटा ट्रस्टला जागा उपलब्ध केल्या असत्या तर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असते. पुन्हा नवीन आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन व्हावे, यासाठी आग्रह धरता आला असता. आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाच्या सुविधा मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुसरीकडे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळत असतानाही जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पदाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.१८ केंद्रांचे गतीने झाले कामकरारानुसार टाटा ट्रस्ट तीन वर्षात २६ आरोग्य केंद्र अत्याधुनिक होणार होते. पहिल्या व दुसºया टप्प्यात १८ आरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याने अत्याधुनिकीकरणाचे काम गतीने झाले. मात्र तिसºया टप्प्यातील आठ आरोग्य केंद्रासाठी मागील सहा-सात महिन्यात जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काम रखडल्याने २०२० पर्यत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही.मनपाच्या जागा वापराविना पडूनशहराच्या विविध भागात महापालिकेच्या जागा वापराविना पडून आहेत. बंद पडलेल्या शाळांची संख्या ५० च्या आसपास आहे. या जागा तशाच पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. काही झोन कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी नासुप्रच्या जागा आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून जागा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्राचे अत्याधुनिकीकरण थांबले आहे. यामुळे महापालिक ा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.३८ हजार रुग्णांची माहिती संकलितटाटा ट्रस्टच्या माध्यमातून अपगे्रड करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारत, ओपीडी कक्ष, सीसीटीव्ही, टीव्ही, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, शौंचालये अशा मूलभूत सुविधा आहेत. माफक दरात रुग्णांना गंभीर आजारावर उपचार मिळत आहे. विशेष म्हणजे येथे येणाºया रुग्णांचा रेकॉर्ड तयार केला जातो. आजवर यात ३८ रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यामुळे त्यांना कोणत्याही आरोग्य केंद्रातून उपचार मिळणे शक्य झाले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका