शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सारीच्या चाचणीसाठी अद्ययावत यंत्र उपलब्ध; एम्सचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:52 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे.

ठळक मुद्देसारीच्या रुग्णांचा वाचणार जीव!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चा रुग्ण कोविड निगेटिव्ह आल्यानंतरही काहींचे योग्य निदान होत नसल्याने मृत्यू होतो. याची दखल घेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे. ‘कोविड-१९’च्या तुलनेत सारी रुग्णांची संख्याही वाढत आहे. सारीच्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक राहत असल्याने प्रत्येक अशा रुग्णाची कोविड चाचणी केली जाते. परंतु अनेक रुग्ण कोविड निगेटिव्ह येतात. या रुग्णांच्या विषाणूचा किंवा जीवाणूचा शोध लागत नसल्याने योग्य उपचाराअभावी मृत्यूही होतो. विदर्भात याचे प्रमाण मोठे आहे.

एम्सच्या मायक्रोबायलॉजी विभागाचा प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ.विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात सारीच्या रुग्णाच्या निदानासाठी ‘बायोफायर फिल्मअरे’ हे अद्यायावत यंत्र खरेदी केले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मिश्रा म्हणाल्या, या अद्यायावत यंत्राच्या मदतीने सारीच्या रुग्णांमधील १८ जीवाणू व चार विषाणूंचा शोध लावणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णाला कोणत्या विषाणूमुळे किंवा जीवाणूची बाधा झाली आहे याचे निदान होऊ शकेल. अशा रुग्णाचे एकदा निदान झाल्यास त्यावर आवश्यक औषधोपचार करून जीव वाचविता येऊ शकतो.

या शिवाय, विदर्भात किंवा राज्यात आढळून येणारे सारीचे रुग्ण कोणत्या जीवाणू किंवा विषाणूचा संसर्ग झाला आहे, त्याचा शोध घेणेही शक्य होऊन मृत्यू रोखण्यास मदत होईल. एखादा जीवाणू कोणत्या अ‍ॅण्टीबायोटिकला रजिस्टन आहे, याचे निदानही हे यंत्र करते. यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या सारीच्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ नागपूर एम्समध्ये हे यंत्र उपलब्ध आहे, असेही त्या म्हणाल्या. या यंत्रावर एका रुग्णाचा चाचणी करण्यासाठी १२ हजार रुपयांचा खर्च येतो. नागपूर व अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी नागपूर विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी तर अमरावतीचे विभागीय आयुक्त पियूष सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने हे सुद्धा रुग्णांसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात येते.

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्य