शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: '...तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, मी देवाकडे मागतो ही मागणी’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 20:12 IST

Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.

नागपूर - दिल्ली आणि पंजाबमधील विजयांनंतर आता आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. दरम्यान, आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजकारण आणि देशाच्या विकासाबाबतचं आपलंय व्हीजन स्पष्ट केलं. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्ही मंदिरात जाता का? मीसुद्धा मंदिरात जातो. तुमच्याप्रमाणे मीही देवाकडे मागणे मागतो. मी देवाकडे नेहमी दोन मागण्या मागतो. त्यातील पहिली म्हणजे देवा माझा भारत देश लवकरात लवकर जगातील एक नंबरचा देश बनू दे. तसेच त्यामध्ये माझा काही तरी हातभार लागू दे.  दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी भारताला जगात एक नंबरचा  देश  झालेले पाहत नाही तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, असे गुपित अरविंद केजरीवाल यांनी उघड केले.

यावेळी २०२४ च्या रणनीतीबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारण