शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य : एएसआयला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:43 IST

मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या  एका सहायक फौजदाराला (एएसआय) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमतनागपूर : मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या  एका सहायक फौजदाराला (एएसआय) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अनंता मधुकर रितोंडे (वय ५२) असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तो पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे.मतिमंद मुलगा एमआयडीसीतील एकात्मतानगरात राहतो. त्याच्या आईचे निधन झाले तर त्याचे वडील वर्षभरापूर्वी यवतमाळला निघून गेले. त्याचे काका त्याचा सांभाळ करतात. मतिमंद असल्यामुळे तो इकडे तिकडे भटकत असतो. मंगळवारी तो दुपारपासून बेपत्ता होता. त्याच्या काकांनी त्याचा इकडे तिकडे शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. पहाटे ५ च्या सुमारास तो घरी परतला. त्यानंतर काकांनी त्याला सकाळी विचारणा केली असता त्याने अनैसर्गिक कृत्याची माहिती दिली. एका मोटरसायकलवाल्याची त्याने माहिती दिली. घटनास्थळही दाखवले. त्यामुळे काका आणि परिसरातील काही महिला पुरुषांनी तिकडे जाऊन चौकशी केली. एकाने हा ज्या व्यक्तीच्या मोटरसायकलवर दिसला त्या मोटरसायकलचा क्रमांक सांगून तो पोलिसासारखा दिसत होता,असे सांगितले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या. सकाळी या भागातील नागरिक मुलाला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी पोलिसांना मोटरसायकलचा क्रमांक दिला. त्या आधारे पोलिसांनी रितोंडेला ताब्यात घेतले. रितोंडेने मात्र इन्कार केला. त्यामुळे पोलिसांनी पीडित मुलासह त्याला घटनास्थळाकडे नेले. त्या भागातील नागरिकांकडे चौकशी केली असता मतिमंद मुलासोबत हीच व्यक्ती होती,असे सांगितले.यापूर्वीही केले तोंड काळे ?रितोंडेने आपण निर्दोष असून, दुचाकीवर बसवून त्याला आपण मंगळवारीच दुपारीच सोडून दिल्याचे त्याने एमआयडीसी पोलिसांना सांगितले. मात्र, घटनास्थळ परिसरात राहणाऱ्या अनेकांनी रितोंडेला मतिमंद मुलासोबत ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबरलाही पाहिले. त्यामुळे त्यानेच गैरकृत्य केले असावे, असा अंदाजवजा आरोप संतप्त नागरिकांनी केला. जमावाचा रोष पाहून परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी रितोंडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर