शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनियंत्रीत टिप्परची स्कूल व्हॅनला धडक , ९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:44 IST

बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात अनियंत्रीत टिप्परने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने विद्यार्थ्यांसह ९ जणांना जबर दुखापत झाली. यातील प्रणव वाघ नामक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने आरोपी टिप्परचालकाला खाली खेचून बेदम मारहाण केली. वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देएक विद्यार्थी गंभीरशाळेच्या आवारात अपघातजमावाने आरोपी चालकाला बदडलेमोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात अनियंत्रीत टिप्परने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने विद्यार्थ्यांसह ९ जणांना जबर दुखापत झाली. यातील प्रणव वाघ नामक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने आरोपी टिप्परचालकाला खाली खेचून बेदम मारहाण केली. वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही शाळा आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ७. ३० च्या सुमारास स्कूल व्हॅनचे चालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. विद्यार्थ्यांना सोडून ते परत जात होते. तर, काही व्हॅनचालकांनी शाळेच्या आवारातील पार्किगमध्ये स्कूल बस, व्हॅन लावल्या होत्या. अचानक एक पांढ-या-निळळ्या रंगाचा टिप्पर वेगात व्हॅनवर येऊन धडकला. त्यावेळी या व्हॅनमधील विद्यार्थी उतरून शाळेच्या आत जात होेते. त्यामुळे ८ विद्यार्थ्यांना दुखापत झाली. दरम्यान, ज्या वेळी हा अपघात झाला त्या वेळी अनेक पालक आपापल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही मॉर्निंग वॉक करणारे तर काही रस्त्याने जाणारे-येणारे होते. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. परिणामी अनेकांनी तेथे धाव घेतली. टिप्पर चालकाच्या हलगर्जीपणे हा अपघात झाल्याचे लक्षात आल्याने संतप्त जमावाने त्याला खाली खेचला आणि बेदम चोप दिला. चालकाला कपडे फाटेपर्यंत आणि रक्तबंबाळ होईपर्यंत जमावाने मारहाण केली. त्यामुळे तो देखिल जखमी झाला. अपघातामुळे शाळेच्या आवारात मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी जमवाची कशी-बशी समजूत काढून आरोपी टिप्परचालकाला ताब्यात घेतले. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. त्यातील प्रणव वाघ याच्या कानाला जबर दुखापत असल्याने पालकांनी त्याला सक्करद-याच्या एका खासगी ईस्पितळात नेण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी टिप्परचालकाला अटक केली.अन्य वाहनांचीही मोडतोडटिप्पर एवढ्या वेगात होता की, पहिल्या व्हॅनला अपघात दिल्यानंतरही त्याचा वेग कमी झाला नाही. तशाच अवस्थेत या टिप्परची अन्य तीन चार वाहनांना धडक बसली. त्यामुळे त्या वाहनांचीही मोडतोड झाली. सुदैवाने या वेळी त्या वाहनांमध्ये कुणी विद्यार्थी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.पालकमंत्र्यांची भेटया अपघाताची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे घटनास्थळी पोहचले. त्यांनी स्कूल प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. डॉक्टरांनाही आवश्यक त्या सूचना केल्या.

टॅग्स :AccidentअपघातSchoolशाळा