शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

न कळत होऊन गेलेला कोरोनाही धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:57 IST

Unknowingly affected corona dangerous सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देएका इसमाची दृष्टी झाली कमी : मेंदूच्या रक्तवाहिनीत तयार झाली रक्ताची गुठळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच पुढे आलेल्या अशाच एका रुग्णाला पॅरालिसीसचा झटका येऊन दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. यामुळे सामान्यांसह डॉक्टरांनीही अधिक जागृक होण्याचे आवाहन केले जात आहे.

मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुठलाही गंभीर आजाराची लक्षणे नसलेल्या एका ५२ वर्षीय पुरुषाची दृष्टी अचानक कमी झाली. रुग्णाने ऑरेंज सिटी हॉस्पिटल गाठले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभय आगाशे यांनी तपासून चष्म्याचा नंबर दिला. परंतु दोन दिवसानंतर चष्म्याचा उपयोग होत नसल्याची समस्या रुग्णाने मांडली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. डोळ्याचा रेटिना सामान्य होता. परंतु दोन्ही डोळ्यांनी उजव्या भागात कमी दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे पुढील तपासणीसाठी रुग्णाला मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सोमकुवर यांच्याकडे पाठविले. त्यांनी काही तपासण्या केल्या. यात डोळ्यातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे निदान झाले. त्यांना पॅरालिसीसचा झटका येऊन गेला होता. परंतु यामागील नेमके काय कारण होते ते पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली.ती निगेटिव्ह आली. शेवटी अ‍ॅण्टिबॉडीज तपासणी केली. यात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्डिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या न कळत त्यांंना कोविड होऊन गेला होता. यामुळे रक्ताची गुठळी होऊन दृष्टी अधू झाली होती. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष नको

नागपूर जिल्ह्यातील कोरोनबाधितांची संख्या १ लाख २६ हजारावर गेली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नव्हती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहरातील ४९ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे. यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे झाले आहे. पोस्ट कोविड उपचाराला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अनुप मरार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर