शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विद्यापीठातील विद्यार्थी करणार आता हिंदू धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास

By आनंद डेकाटे | Updated: May 21, 2024 18:35 IST

Nagpur : हिंदू धर्म संस्कृती मंदिरासोबत सामंजस्य करार; भारतीय ज्ञान परंपरेचे विद्यार्थ्यांना मिळविता येणार ज्ञान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी आता हिंदू धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास करतील. या माध्यमातून त्यांना भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन करणे शक्य होणार आहे. याबाबत हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचे हस्तांतरण मंगळवारी करण्यात आले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये 'भारतीय ज्ञान परंपरा' याचा समावेश करण्यात आला आहे. एनईपी २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासता यावी. यावर अधिक संशोधन करता यावे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या वतीने डॉ. सुधाकर इंगळे व मंगेश श्रीराम जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कक्षात झालेल्या कार्यक्रमाला प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह, डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. सतीश चाफले, हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे डॉ. सुधाकर इंगळे, मंगेश जोशी, अर्थश्री मराठे, श्रीरंग चितळे, राजेश दामले, तुरळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्राचीन साहित्यावर होणार संशोधनभारतीय प्राचीन ज्ञानासंबंधी साहित्य हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्याकडे संरक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करू इच्छिणारे संशोधक तसेच विद्यार्थ्यांना हिंदू धर संस्कृती मंदिर यांच्याकडील प्राचीन भारतीय साहित्य संशोधनाकरिता हाताळता येणार आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेचा सखोल अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठ तसेच हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या दरम्यान शैक्षणिक आदान प्रदान देखील केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक संशोधन देवान घेवान देखील होणार आहे. या सोबतच परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, सिम्पोजियम, विविध स्पर्धा, श्रेयांक बदल आधी उपक्रम राबविण्यात येईल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर