शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

हिवाळी परीक्षांसाठी विद्यापीठाचे सावध पाऊल

By admin | Updated: July 10, 2015 02:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल खोळंबले असताना परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे.

निकालांशिवायच पुढील परीक्षेचे वेळापत्रक : १६ आॅक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल खोळंबले असताना परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे. हिवाळी परीक्षांना १६ आॅक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा विभागातर्फे संभाव्य तारखांची साडेतीन महिने अगोदरच घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा नियंत्रक नसल्यामुळे परीक्षा विभाग पूर्णत: कोलमडलेला आहे. मागील वर्षी हिवाळी परीक्षांची योग्य तऱ्हेने तयारी झाली नाही व परीक्षा समोर ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती. यंदादेखील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा समोर ढकलण्यात आल्या होत्या. शिवाय उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्याप मोठ्या प्रमाणावर रखडले आहे. त्यामुळे ऐन वेळेवर ताण येऊ नये यासाठी उन्हाळी परीक्षांसंदर्भात परीक्षा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याकरिताच ६५४ परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक यंदा जुलै महिन्यातच घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख नंतर घोषित करण्यात येईल असेदेखील विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.पाच टप्प्यात होणार परीक्षाविद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीए, बीएसस्सी व बीकॉमच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दुसरा टप्पा ३० आॅक्टोबरपासून सुरू होईल व यात पदव्युत्तर परीक्षांचा समावेश राहणार आहे. हिवाळी परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यास ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल व यात अभियांत्रिकी व तांत्रिक विषयांच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश असेल. २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यात नियमित सत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील तर १ डिसेंबर रोजी अभियांत्रिकीच्या विषम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होईल. परीक्षांच्या संभाव्य तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)