शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे निर्देश : १७ ऑगस्टपासून ऑनलाईन वर्ग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देपदव्युत्तर विभाग, महाविद्यालयांमधील संभ्रम दूरप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग यामुळे पुढील सोमवारपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने लेखी निर्देश न काढल्याचे कारण समोर करत काही महाविद्यालये व पदव्युत्तर विभागप्रमुखांनी कुठलीही तयारी केली नव्हती. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने गुरुवारी विद्यापीठाकडून अधिसूचना जारी करण्यात आली.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी केले. सत्र प्रणालीनुसार महाविद्यालयांना डिसेंबर महिन्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यूजीसीच्या नियमांनुसार सेमिस्टर सत्रात किमान ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र व्हायला हवे. मात्र ‘कोरोना’मुळे महाविद्यालये व विभागात प्रत्यक्ष वर्ग होणे सध्या तरी शक्य नाही. अशा स्थितीत ‘ऑनलाईन’ वर्गांच्या माध्यमातून अध्यापन अपेक्षित आहे. मात्र विद्यापीठातीलच काही विभागप्रमुखांनी यासंदर्भात पुढाकार घेतलेला नाही. प्रशासनाकडून अद्याप निर्देश न आल्याचे कारण सांगत काही ‘अनुभवी’ विभागप्रमुखांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. यामुळे ‘आॅनलाईन’ वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू होणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.अखेर नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निर्देशांनंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्रासंदर्भात सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केले होते. संबंधित शुद्धिपत्रक तसेच राज्य शासनाच्या २९ जुलैच्या निर्देशांनुसार सर्व संलग्नित महाविद्यालये, पदव्युत्तर विभागांत ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात यावे, असे या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन