संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:05 AM2017-08-18T02:05:54+5:302017-08-18T02:06:16+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

The union grew up due to piety hatred | संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

संघ परधर्म द्वेषामुळे मोठा झाला

Next
ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : राष्ट्रपित्याची समाधी उखडण्याच्या कृत्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेषामुळे मोठा झाला. त्यांचा प्रभाव वाढण्याला बाबरी मशीद विध्वंसापासून सुरुवात झाली, असे स्पष्ट मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
मध्य प्रदेशातील राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या समाधी जेसीबीने उखडण्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी दक्षिणायन महाराष्ट्र संस्थेच्यावतीने गुरुवारी बजाजनगरातील कस्तुरबा भवन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार आणि विदर्भावादी नेते व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
भारतात ८० टक्के नागरिक हिंदू आहेत. असे असतानाही बाबरी मशीद विध्वंसापूर्वी संघ व भाजपाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. महात्मा गांधी हिंदू होते. परंतु, त्यांनी कधीच दुसºया धर्माचा द्वेष केला नाही. त्यांच्यासाठी सर्व धर्म समान होते. संघ परिवाराचे हिंदुत्व स्वार्थी आहे. त्यांनी दुसºया धर्माचा द्वेष करून देशातील वातावरण धर्मांध केले आहे. त्यांचे विचार धोकादायक असल्यामुळे नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे असे, द्वादशीवार यांनी सांगितले. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस दुबळा व हवालदिल झाला आहे. त्यांच्याकडे पैसा, प्रभावी प्रवक्ते व ताकदीचे नेते नाहीत. अन्य पक्ष प्रादेशिक आहेत. त्यामुळे संघ व संघ परिवाराला रोखणारा कुणीच नाही. महात्मा गांधी लोकनेते होते. त्यांनी उभा केलेला लोकसंघर्ष त्यांच्या मृत्यूसोबतच हरवला. तरुणांना अशा संघर्षाचे आकर्षणअसून ते आता काँग्रेसकडे नाही. संघ परिवाराच्या विध्वंसक विचारांचा विरोध करण्यासाठी निषेध सभा घेण्यापेक्षा जनआंदोलन करण्याची गरज आहे असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.
भाजपा सरदार पटेल यांचा उपयोग सोईने करीत आहे. पंडित नेहरू यांनी पटेल यांच्यावर अन्याय केला असा खोटा प्रचार केला जात आहे, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.
भाजपा शासनाच्या काळात देशातील सांस्कृतिक मूल्यांचा संहार होत आहे अशी टीका खांदेवाले यांनी केली तर, संघ परिवाराचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत, असे केदार यांनी सांगितले. संस्थेचे प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक तर अरुणा सबाने यांनी संचालन केले.

Web Title: The union grew up due to piety hatred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.