शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात केंद्र शासनाची २३७४ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 19:01 IST

केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तरोडी येथील खसरा क्रमांक ६३ मधील २३.५ एकर जागेवर २३७४ घरांचा प्रकल्प उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देदुर्बल घटकातील लोकांना मोठा दिलासानासुप्र लवकरच कामाला सुरुवात करणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तरोडी येथील खसरा क्रमांक ६३ मधील २३.५ एकर जागेवर २३७४ घरांचा प्रकल्प उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.नवी दिल्ली येथे गेल्या बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाची केंद्र शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाकरिता विविध पातळीवरील मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी व या प्रकल्पाच्या जमीन वापराचा बदल प्रस्ताव मंजूर करून या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे या प्रकल्पाकरिता पाठपुरावा करण्यात आला होता.नासुप्रद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या  प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. प्रस्तावित २३.५ एकर जागेवर २३७४ गाळे उभारण्यात येतील. सदर इमारत जी प्लस ४ या स्वरूपात राहणार आहे. त्यामध्ये बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ‘सर्व सुविधायुक्त अशी घरे’ या दृष्टीने या प्रकल्पाकडे बघितल्या जात आहे. यात पावसाळी नाल्या, मलवाहिका, मलनिस्सारण केंद्र, डांबरी रस्ते, साईट डेव्हलपमेंट, दुकाने, सोसायटी कार्यालय तथा योगा केंद्र, कंपाऊंड वॉल, रुफ सोलर पॉवर, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किंमत प्रत्येकी ७.५ लाख आहे व यावर केंद्र व राज्य शासनामार्फत एकूण २.५ लाखाचे अनुदान प्राप्त होईल. नासुप्रद्वारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ गाळ्यांचे निर्माण कार्य सुरू झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माण कार्य लवकरच सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. याव्यतिरिक्त तरोडी खुर्द येथे ९४२ घरांचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Homeघरprime ministerपंतप्रधान