शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

 दुर्दैवी! आईच्या शोधात चिमुकल्याचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 19:43 IST

Nagpur News आई कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागोमाग अडीच वर्षांचा चिमुकला घराच्या सभोवताली जाऊन बघत असतानाच सेप्टिक टँकमध्ये पडला व टँकमध्येच त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे उमरेड येथे घडली हृदय हेलावून टाकणारी घटना

नागपूर : घरातील केरकचरा फेकण्यासाठी आई घराबाहेर गेली. अशातच आई कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी तिच्या मागोमाग अडीच वर्षांचा चिमुकला घराच्या सभोवताली जाऊन बघत असतानाच सेप्टिक टँकमध्ये पडला व टँकमध्येच त्याचा मृत्यू झाला. सक्षम साधुराम जांगडा (रा. कवारी, हरयाणा) असे या चिमुकल्याचे नाव आहे. हृदय हेलावून टाकणारी ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

मूळ हरयाणा राज्यातील कवारी गावातील निलम साधुराम जांगडा ही महिला बीपीएडच्या परीक्षेसाठी भाऊ दीपक जांगडा आणि मुलासह तीन दिवसांपूर्वीच (२१ जूनला) उमरेड येथे आली. रेवतकर ले- आऊट विकास कॉलनी येथील राजेश्वर मैदमवार यांच्याकडे तिघेही किरायाच्या खोलीत वास्तव्यास होते.

सकाळी ९ वाजताच्या सुमारास सक्षमची आई निलम केरकचरा फेकण्यासाठी बाहेर गेली. गेटबाहेर रस्ता ओलांडून परत येत नाही, तोच सक्षम दिसेनासा झाला. एक-दोन मिनिटांतच मुलगा असा अचानक गायब झाल्यामुळे ती अस्वस्थ झाली. आरडाओरडा केला, शोधाशोध सुरू झाला. सोशल मीडियावरही मुलगा हरवल्याचे मॅसेज सेंड झाले.लागलीच पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. आधी संपूर्ण परिसर शोधून काढत असताना घराच्या गल्लीत असलेल्या सेप्टिक टँकवरील पाट्या अस्ताव्यस्त दिसल्या. मुलगा या टँकमध्ये पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी घेतला. यानंतर टँकमधील घाण बाहेर काढण्यात आली. टँकमध्ये चिमुकला सक्षम मृतावस्थेत आढळून आला.

अन् सारेच गहिवरले

मुलगा हरवला, अशा भ्रमात आई निलम होती. सेप्टिक टँकमधील घाण बाहेर काढत असताना ती शेजारी अश्रू ढाळत बसली होती. पोलिसांना मुलाचे प्रेत दिसून आले. अशातच ती ‘माझा मुलगा कधी मिळणार?’ अशी आर्त हाक घेत पोलिसांना विचारू लागली. मुलगा याच ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच ती धाय मोकलून रडू लागली. 

हरयाणाकडे रवानामृतकाचे वडील साधुराम जांगडा हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हरयाणा येथून उमरेडला येणार होते. दुसरीकडे उमरेड ग्रामीण रुग्णालयात सक्षमचे शवविच्छेदन केल्या गेले. पती पोहोचल्यानंतर जांगडा कुटुंबीय हरयाणाला आपल्या गावी रवाना झालेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात