शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुणवंत विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:02 IST

बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे. आंचल मोरेश्वर वानखेडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीनगरात राहणाऱ्या आंचलला बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले. त्यामुळे दोन दिवसांपासून वानखेडे परिवारातील आनंद गगनात मावेनासा झाला होता. या आनंदातच रविवारी दुपारी मोरेश्वर वानखेडे बाहेर गेले. त्यांची पत्नी, मुलगी आंचल आणि तिची छोटी बहीण अशा तिघी मायलेकी घरात होत्या. आंचलने आपल्या बहिणीला आणि आईला फोटो काढण्यासाठी तयार होण्यास सांगितले. या तिघीही तयार झाल्या. मोबाईलमध्ये फोटो काढताना अचानक आंचलचा पाय टेबलमध्ये अडकून ती डोक्याच्या भारावर खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे घरच्यांनी तिला इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांवर तीव्र मानसिक आघात झाला आहे. शेजारीही हळहळ व्यक्त करीत आहेत. अत्यंत हुशार असलेली आंचल एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होती.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी