शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कूलरचा करंट लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:54 IST

अजनीतील बजरंगनगरात राहणारे शुभम अशोक काते (वय २२) यांचा कूलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला.

ठळक मुद्देबजरंगनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील बजरंगनगरात राहणारे शुभम अशोक काते (वय २२) यांचा कूलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर ते कूलरजवळ पाण्याची मोटर सुरू आहे की नाही ते बघण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना करंट लागला. मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.दोघांनी लावला गळफासकळमन्यातील दुर्गानगरात राहणारा कुमार सुधांशु पप्पू पांडे (वय १५) या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी २.२० वाजता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.अशाच प्रकारे गिट्टीखदानमधील गनोबा मंदिरजवळ, मानसेवा नगरात राहणारे जयेंद्र जनार्दन महाजन (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. वच्छला जनार्दन महाजन (वय ६०) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.रेल्वेगाडीतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यूअज्ञात रेल्वेगाडीतून पडून जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित इसमाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून उंची ५ फूट ६ इंच, रंग काळा-सावळा, शरीर मध्यम, चेहरा गोल आहे. हा इसम रेल्वेस्थानक कळंबाजवळ अज्ञात रेल्वेगाडीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला जीटी एक्स्प्रेसने नागपुरात आणण्यात आले. त्यास उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास शेख बाबर करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज