शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! खेळता खेळता पाचव्या माळ्यावरून पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: March 2, 2023 17:33 IST

Nagpur News ज्या एकुलत्या एक चिमुकल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तो खेळत असताना त्याच्या बाललीला पाहताना रमणाऱ्या मातापित्यांच्या नशिबी त्याचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ आली.

योगेश पांडे नागपूर : ज्या एकुलत्या एक चिमुकल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तो खेळत असताना त्याच्या बाललीला पाहताना रमणाऱ्या मातापित्यांच्या नशिबी त्याचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ आली. खेळत असताना पाचव्या माळ्यावरून पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचव्या मजल्यावरून पडल्यावरदेखील त्याने आयुष्यासाठी संघर्ष केला. मात्र अखेर त्याला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.

शेख अहफाज (२) असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. तो शेख मोहरम उर्फ शेख ख्वाजा (४०, अशोक नगर, उप्पलवाडी क्वॉर्टर) यांचा एकुलता एक मुलगा होता. २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत होता. खेळता खेळता तो बाल्कनीत गेला. तेथे तो गजाला पकडून उभा झाला व त्याचा तोल गेला. तोल जाऊन तो थेट पाचव्या माळ्यावरून खाली पडला. पडण्याचा आवाज आल्याने इमारतीतील लोक खाली आले. त्याच्या डोक्याला व शरीराच्या इतर अवयवांना जबर मार लागला होता. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तातडीने मेडिकल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. कपिलनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात