शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अक्षम्य! पोटच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 10:45 IST

Nagpur News पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा एका नराधमाने प्रयत्न केला. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ठळक मुद्दे नराधम गजाआडगिट्टीखदानमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा एका नराधमाने प्रयत्न केला. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. गिट्टीखदानमधील ही घटना आहे.आरोपी ४० ते ४५ वर्षाचा आहे. तो आधी टेलरिंगचे काम करायचा त्याला दारू गांजा असे सर्वच व्यसन आहे. व्यसनाधीन झाल्यामुळे त्याच्याकडे कपडे शिवायला कुणी येत नव्हते. त्यामुळे तो व्यसन भागविण्यासाठी मोलमजुरी करतो. त्याला १४ वर्षाची मुलगी आहे. पत्नी घरी नसताना किंवा ती रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना तो या मुलीचा लैंगिक छळ करू लागला. २५ मे पासून त्याचे हे कृत्य सुरू आहे. रविवारी मध्यरात्री त्याने असाच प्रयत्न केला. मुलीने आईला या छळाची आधीच कल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे रविवारी मध्यरात्री त्याने मुलीसोबत अश्लील चाळे सुरू करताच संतापलेल्या पत्नी आणि मुलीने त्याला बदडून काढले. नंतर सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याला मंगळवारी कोर्टासमोर हजर केले.विकृत मानसिकता !या नराधमाला अमली पदार्थांचे व्यसन आहेच. सोबत मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म बघण्याचीही त्याला सवय आहे. वेळ मिळाला की तो मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत बघण्यात दंग होतो. त्यातूनच त्याला पोटच्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्याची विकृती जडली असावी, असा अंदाज आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग