लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : भरधाव अनियंत्रित ट्रकचालकाने प्रथम एका दुचाकीला धडक देत धूम ठाेकल्यानंतर दुसऱ्या माेपेडस्वाराला धडक दिली. त्यात दाेन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना कामठी-गुमथळा मार्गावरील आवंढी शिवारात बुधवारी (दि.२३) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
रामेश्वर गाेरबाजी वकेकार (४०, रा. माथनी, ता. माैदा) व माराेतराव लसुटे (६६, रा. गाेडेगाव, ता. पारशिवनी) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामेश्वर वकेकार हे आपल्या एमएच-३१/बीसी-७२९७ क्रमांकाच्या दुचाकीने गुमथळामार्गे गादा येथे जात हाेते. दरम्यान आवंढी शिवारात कामठीकडून गुमथळाकडे जात असलेल्या एमएच-३१/सीबी-८०१६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक देत पळ काढला. दरम्यान ट्रकचालकाने एमएच-४०/एक्स-०२२३ क्रमांकाच्या लसुटे यांच्या माेपेडला जाेरात धडक दिली. दाेन्ही दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन गुमथळाच्या दिशेने पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी नवीन कामठी पाेलिसांनी आराेपी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे.