शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

हायकोर्टात बेशिस्त पार्किंग

By admin | Updated: September 17, 2016 03:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील परिसरात खासगी वकील, सरकारी वकील व प्रशासकीय अधिकारी

अर्ज दाखल : संयुक्त बैठक घेण्याचा आदेशनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील परिसरात खासगी वकील, सरकारी वकील व प्रशासकीय अधिकारी बेशिस्तपणे वाहने पार्क करतात. यावर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी शुक्रवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त, उच्च न्यायालयाचे प्रबंधक व वकील संघटनेचे सचिव यांना अर्जातील तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तीन आठवड्यांत संयुक्त बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.नागपूर जिल्हा वकील संघटनेचे माजी सचिव अ‍ॅड. मनोज साबळे यांची जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालयांच्या विकासासंदर्भातील जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेत हा अर्ज सादर करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. सुरक्षा बंदोबस्तातील पोलीस वकिलांना योग्य पद्धतीने वाहने पार्क करण्याची सूचना करतात. परंतु, त्यांचे ऐकण्याचे सोडून हुज्जत घातली जाते. यामुळे पोलिसांनीही टोकणे सोडले आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हा प्रश्न सोडविण्यासाठी वयाने ज्येष्ठ वकिलांना दक्षिण भागाकडे, अन्य खासगी वकिलांना मुख्य प्रवेशद्वारापुढील पोलीस चौकीच्या मागील परिसरात, सरकारी वकिलांना पश्चिमेकडे, कनिष्ठ वकिलांना पूर्व द्वाराकडे जाणाऱ्या रोडला लागून तर, दुचाकींसाठी पूर्व भागाकडील कम्पाऊंड वॉलला लागून जागा देण्यात यावी असे उपाय अर्जात सूचविण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)